Mill workar housing scheme: सुमारे १७ हजार गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित

राज्यातील तसेच देशातील विविध भागांतून गिरणी कामगार व त्यांचे वारस पात्रता निश्चितीकरिता कागदपत्र सादर करण्यास म्हाडा मुख्यालयाला भेट देत आहेत.

503
Mill workar housing scheme: सुमारे १७ हजार गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित
Mill workar housing scheme: सुमारे १७ हजार गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित

म्हाडा मुंबई मंडळामार्फत मुंबईतील ५८ बंद तथा आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या सुमारे दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता आयोजित विशेष अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अद्यापपर्यंत १६,९८० गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून कागदपत्र प्राप्त झाली आहेत. (Mill workar housing scheme)
त्यापैकी ११,११४ गिरणी कामगारांनी ऑनलाइन पद्धतीने या अभियानात सहभाग घेतला आहे. म्हाडातर्फे राबविण्यात येणारे हे विशेष अभियान विनामूल्य राबविण्यात येत असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या पात्रता निश्चितीच्या या विशेष अभियानास गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरपासून हे अभियान म्हाडा कार्यालयाजवळील समाज मंदिर हॉल, एम.आय.जी क्रिकेट ग्राउंडसमोर, गांधीनगर, वांद्रे (पूर्व), येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या कालावधी मध्ये घेण्यात येत आहे.

म्हाडामध्ये कागदपत्र सादर करण्यासाठी येणार्‍या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी जमा करण्यास आणलेली कागदपत्रे ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने जमा करून घेण्यात येत आहेत. याकरिता कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येत नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. या अभियाना दरम्यान असे लक्षात आले आहे की, राज्यातील तसेच देशातील विविध भागांतून गिरणी कामगार व त्यांचे वारस पात्रता निश्चितीकरिता कागदपत्र सादर करण्यास म्हाडा मुख्यालयाला भेट देत आहेत. अशा अर्जदारांकरिता मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, कागदपत्रे ऑनलाइन आणि ऑफलाइन यापैकी कोणत्याही एका प्रकारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध गिरणी कामगार यांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयात येण्यापेक्षा कागदपत्र सादर करण्याकरिता ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा.

(हेही वाचा : Bangladeshi : मुंबईत बांगलादेशी घुसखोर वाढले, कांदिवलीत तिघांना अटक)

गिरणी कामगार/वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी गिरणीमध्ये काम केल्याबाबत विहित केलेल्या १३ पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने http://millworkereligibility.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा mill worker eligibility या मोबाईल ॲपद्वारे कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. mill worker eligibility हे ॲप अर्जदार आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. अण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयोएस व्हर्जन ॲप स्टोरमध्ये mill workers eligibility या नावाने उपलब्ध आहे. या माध्यमातून गिरणी कामगार/ वारस अर्जदार कधीही आणि कुठूनही आपली कागदपत्रे संगणकीय प्रणालीत अपलोड करू शकतील व याकरिता त्यांना म्हाडा कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता लागणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.