होआंगझाओ क्रीडास्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी खास असेल. क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांमध्ये पदकं निश्चित आहेत. तर तिरंदाजीतही खेळाडूंचा प्रयत्न असेल तो पदकांमध्ये भर घालण्याचाच. शिवाय यंदा पहिल्यांदाच भारतीय पथक १०० पदकांचा आकडा गाठणार हे स्पष्ट आहे. म्हणूनही शनिवारच्या (७ ऑक्टोबर) सामन्यांकडे भारतीयांची नजर असेल.
सुरुवात तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकाराने होईल. रिकर्व्ह प्रकारात भारतीय तिरंदाजांनी शुक्रवारी ३ सुवर्णांची भर धातली आहे. तशीच कामगिरी आता कम्पाऊंड प्रकारात करण्याचा तिरंदाजांचा प्रयत्न असेल. जाणून घेऊया भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक,
तिरंदाजी
सकाळी ६ वाजून १० मिनिटं – महिलांचा कम्पाऊंड वैयक्तिक कांस्य पदकाचा सामना – अदिती स्वामी वि. रातिह फादली (इंडोनेशिया)
सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – महिलांच्या कम्पाऊंड वैयक्तिक प्रकारातील सुवर्ण पदकाचा सामना – ज्योती वेन्नम वि. सो चे वॉन (द कोरिया)
सकाळी ७ वाजून १० निनिटं – पुरुषांचा कम्पाऊंड वैयक्तिक प्रकारातील सुवर्ण पदकाचा सामना – ओजस देवतळे वि. अभिषेक वर्मा (दोघे भारतीय)
क्लाईंबिंग
सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – महिलांची बोल्डर व लीड स्पर्धा उपान्त्य फेरी – शिवानी चरक व सानिया शेख
जू-जित्सू
सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – पुरुष व महिलांची बाद फेरी
दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – अंतिम फेरी खेळाडू पात्र ठरल्यास
कनोई स्प्रिंट
सकाळी ६ वाजून ५५ मिनिटं – पुरुषांचा कयाक उपान्त्य सामना – हितेश कुमावत व शुभम केवट
कबड्डी
सकाळी ७ वाजता – महिलांचा सुवर्ण पदकाचा सामना – भारत वि. चीन तैपई
दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – पुरुषांचा सुवर्ण पदकाचा सामना – भारत वि. इराण
कुस्ती
सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – पुरुषांची बाद फेरी (दीपक पुनिया, विकी चहर व सुमित मलिक)
दुपारी २ वाजून ३० मिनिटं – पुरुषांची फ्रीस्टाईल कुस्ती अंतिम फेरी – पात्र झाल्यास (दीपक पुनिया, विकी चहर व सुमित मलिक)
हॉकी
दुपारी १ वाजून ३० मिनिटं – महिलांचा कांस्य पदक सामना – भारत वि. जपान
(हेही वाचा Asian Games 2023 : हॉकीत ९ वर्षांनंतर मिळालं सुवर्ण, पॅरिस ऑलिम्पिकसाठीही प्रवेश निश्चित)
क्रिकेट
सकाळी ११ वाजून ३० मिनिटं – पुरुषांचा अंतिम सामना – भारत वि. अफगाणिस्तान
बॅडमिंटन
सकाळी ११ वाजून ३० मिनिटं ते २ वाजून ३० मिनिटं – पुरुषांचा दुहेरी अंतिम सामना – सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी वि. चॉय सोल यू व किम वॉन हो (द कोरिया)
बुद्धिबळ
दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – पुरुषांची सांघिक लढत नववी फेरी (पदक निश्चिती) – डी गुकेश, विदिथ गुजराती, अर्जुन एरिगसी, हरीकृष्णा, रमेशबाबू व प्रग्यानंदा
दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – महिलांची सांघिक लढत नववी फेरी (पदक निश्चिती) – कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, वंतिका अगरवाल व सविता श्री
सॉफ्ट टेनिस
सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – महिलांची वैयक्तिक उपउपान्त्य फेरी – रागश्री मनोगरबाबू वि. यू मा (चीन)
सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – पुरुषांची दुसरी फेरी – अनिकेत पटेल वि. चँग यू सुंग (चीन चैपई)
सकाळी ९ वाजून ४५ मिनिटं – पुरुषांची एकेरी उपउपान्त्य फेरी – जय मीना वि. अनिकेत पटेल, चँग यु सुंग यांच्यातील विजेता
सकाळी १० वाजता – महिला व पुरुष एकेरीच्या पदक विजेत्या फेऱ्या (खेळाडू पात्र ठरल्यास)
व्हॉलीबॉल
सकाळी ८ वाजता – महिलांची ९,१० वं स्थान निश्चित करणारा सामना – भारत वि. हाँगकाँग
Join Our WhatsApp Community