US-India Relations : पेंटागॉनकडून भारताचे कौतुक; चीनला म्हटले ‘आव्हान’ 

117
US-India Relations : पेंटागॉनकडून भारताचे कौतुक; चीनला म्हटले 'आव्हान' 
US-India Relations : पेंटागॉनकडून भारताचे कौतुक; चीनला म्हटले 'आव्हान' 

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने भारतचे कौतुक केले आहे. (US-India Relations) अमेरिका भारतासोबत मजबूत संरक्षण भागीदारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अमेरिकेने मान्य केले आहे. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रॅडर म्हणाले, ”आम्ही संरक्षण स्तरावर भारतासोबतच्या संबंधांचे खूप कौतुक करतो. अमेरिका भारतासोबत मजबूत संरक्षण भागीदारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. 1997 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण व्यापार जवळजवळ नगण्य होता; परंतु आज तो 20 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे.” (US-India Relations)

(हेही वाचा – Curd : दह्यात ‘ही’ पांढरी गोष्ट मिसळून कधीही खाऊ नये)

रेडर म्हणाले, ‘जेव्हा एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि आंतरराष्ट्रीय नियम-आधारित संरक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही भारत आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांसोबत अमेरिकेच्या भागीदारीची प्रशंसा करतो. या व्यवस्थेमुळे अनेक वर्षांपासून शांतता आणि स्थैर्य कायम आहे.” एका प्रश्नाच्या उत्तरात रेडर म्हणाले की, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयासाठी चीन हे सातत्यपूर्ण आव्हान आहे. (US-India Relations)

अमेरिका आणि भारत यांच्यातील समन्वय वाढवण्यास उत्सुक

यापूर्वी जॉर्जियाचे खासदार जॉन ओसॉफ यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी काम करण्याचे वचन दिले होते. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन्स’ (NFIA) द्वारे भारत-अमेरिकन मैत्री साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ऑसॉफ म्हणाले, ”मी अमेरिका आणि भारत यांच्यातील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध, संशोधन, सहकार्य आणि सुरक्षा समन्वय वाढवण्यासाठी काम करण्यास उत्सुक आहे.”

डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार ओसॉफ यांना NFIA ने भारत-अमेरिका संबंधांतील त्यांच्या भूमिकेबद्दल सन्मानित केले. यूएस कॅपिटल (यूएस संसद भवन) येथे आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, ”मला माहित आहे की, भारतीय अमेरिकन समुदाय आणि जॉर्जियामधील भारतीय डायस्पोरा समुदायासाठी अमेरिका-भारत संबंध किती महत्त्वाचे आहेत. मला गेल्या वर्षी भारतात एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचा आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला.” (US-India Relations)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.