Accident : नगर कल्याण महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात ,१५ ते २० प्रवासी गंभीर जखमी

अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.

150
Accident : नगर कल्याण महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात ,१५ ते २० प्रवासी गंभीर जखमी
Accident : नगर कल्याण महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात ,१५ ते २० प्रवासी गंभीर जखमी

नगर – कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Mahamarg) असणाऱ्या माळशेज घाटात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Accident)
कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती तर ट्रक कल्याणच्या दिशेने जात होता. आयशर ट्रक या दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या आणि हा अपघात झाला आहे.नगर – कल्याण माहामर्गावर माळशेज घाटात रात्री साधारण ११.३०चा सुमारास हा अपघात झाला आहे. एसटी आणि ट्रकची धडक एवढी भीषण होती की, ट्रक पलटी झाला तर एस टी बसचे ही मोठे नुकसान झाले आहे. कल्याण – शिरोली नावाची बस ही शिरोली येथे मुक्कामी येत असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांवर आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयशर ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.

(हेही वाचा : Asian Games 2023 : भारताची ५ पदकं निश्चित, कधी होणार या पदकांचे सामने? भारतीय संघाचं शनिवारचं वेळापत्रक)

मृत्यूचा महामार्ग
नगर – कल्याण महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून या महामर्गावर दररोज अपघात होऊन लोकांना आपला जीव गमावावा लागत आहे. मागच्या आठवड्यात पाच शेतजुरांना एका गाडीने उडवले होते. त्यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात होत असून यावर रस्ते प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून होऊ लागली आहे. मात्र, एसटी आणि ट्रकचा अपघात झाल्याने झोपेत असलेल्या प्रवासी नागरिकांवर “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” अशी अवस्था पाहायला मिळाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.