छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाडीबंदर यार्डमध्ये रेल्वे मार्गिकेच्या जोडणीसाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवार मध्यरात्री सहा तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. (Mumbai News) यामुळे शनिवार-रविवारी धावणारी (२२१०५/६) सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर मडगाव-सीएसएमटी वंदे भारत, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे ५ आणि शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ५ या कालावधीत हा ब्लॉक आहे. (Mumbai News)
(हेही वाचा – Pune Car Accident : पुण्यात मद्यपी कारचालकाने केली ‘संतोष माने’ प्रकाराची पुनरावृत्ती)
ब्लॉकनंतर गती वाढणार
सीएसएमटीवर एकूण १८ फलाट असून फलाट क्रमांक ८ ते १८वरून मेल-एक्स्प्रेस वाहतूक होते. रिकाम्या गाड्या वाडीबंदर/माझगाव यार्डमध्ये इंजिनच्या मदतीने देखभाल-दुरुस्तीसाठी दाखल करण्यात येतात. मार्गिका जोडणीमुळे ही वाहतूक वेगाने शक्य होणार आहे. (Mumbai News)
बदललेले वेळापत्रक
- साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२४) दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
- सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस (११००४) पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
- हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२८१०) शनिवारी दादर स्थानकात रद्द करण्यात येणार.
- मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२) रविवारी पनवेलपर्यंत चालवणार आहेत.
- अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस शनिवारी ठाण्यात, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस दादरमध्ये, रविवारी अमरावती-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस दादरमध्ये रद्द करण्यात येणार आहे.
तुतारी, जनशताब्दी पनवेलहून रवाना
दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस शनिवारी मध्यरात्रीनंतर ०१.१५ वाजता पनवेल स्थानकातून रवाना झाली. याचा परिणाम पनवेल स्थानकात दिसून आला. शनिवारी पहाटे पनवेल स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी पहाटे ६.२५ वाजता पनवेल स्थानकातून रवाना होणार आहे. (Mumbai News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community