Israel News : हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले, इस्रायल सरकार देणार ‘असे’ प्रत्युत्तर

गाझामधून इस्रायलवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने हमासला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे

148
Israel News : हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले, इस्रायल सरकार देणार 'असे' प्रत्युत्तर
Israel News : हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले, इस्रायल सरकार देणार 'असे' प्रत्युत्तर

हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. (Israel News) यानंतर आक्रमक झालेल्या इस्रायलने हमासला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी दिली आहे. गाझामधूनही दहशतवादी इस्रायलमध्ये घुसल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले की, कट्टरपंथी इस्रायलमध्ये घुसले आहेत. हमासकडून रॉकेट डागण्यात आले आहेत. या परिस्थितीत इस्रायलने परिसरातील रहिवाशांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलने हमासवर रॉकेट डागल्याचा आरोपही केला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने गाझा पट्टीतील लोकांना घरात रहाण्याचे आवाहन केले आहे. (Israel News)

(हेही वाचा – Vijay Wadettiwar : मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; विजय वडेट्टीवार आग्रही)

दक्षिण इस्रायलमध्येही गोळीबार झाला आहे. हमासच्या आतंकवाद्यांची सैनिकांशी हिंसक चकमक झाली आहे. इस्त्रायली लष्कराने घुसखोरीबाबत वक्तव्य केले आहे. गाझा बाजूने दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे लष्कराने सांगितले. इस्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) ‘युद्धाची तयारी’ जाहीर केली आहे.

महान क्रांतीचा दिवस – हमास

हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद देईफ यांनी एक निवेदन जारी करून सकाळचे हल्ले आणि घुसखोरीला ‘महान क्रांतीचा दिवस’ असे संबोधले. या निवेदनानंतर IDF ने म्हटले की, हमास इस्रायली अरबांना शस्त्रे घेण्याचे आवाहन करत आहे आणि अरबांना इस्रायलच्या सीमेवरील हल्ल्यांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करत आहे. (Israel News)

इस्त्रायलने परिणाम भोगण्याची धमकी दिली

IDF ने सांगितले की IDF इस्रायली नागरिकांचे संरक्षण करेल. याची मोठी किंमत हमास या दहशतवादी संघटनेला चुकवावी लागेल. या हल्ल्यामागे असलेल्या हमासला या घटनांचे परिणाम भोगावे लागणार आहेत. यासाठी कोणीही जबाबदार राहणार नाही. (Israel News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.