Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, PMLA कोर्टाचे काय आहे निरीक्षण

128
Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, PMLA कोर्टाचे काय आहे निरीक्षण
Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, PMLA कोर्टाचे काय आहे निरीक्षण

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप केले होते. (Hasan Mushrif) यामध्ये कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांचाही समावेश होता. दरम्यान शुक्रवारी यावर सुनावणी झाली यातील महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळला.

(हेही वाचा – Israel News : हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले, इस्रायल सरकार देणार ‘असे’ प्रत्युत्तर)

राज्याचे कॅबीनेट मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केले असल्याचे निरीक्षण पीएमएलए कोर्टाने नोंदवले आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ४६ वर्षीय महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. तसेच एफआयआरमध्ये आरोप केल्याप्रमाणे, मुख्य आरोपी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेल्या पैशाची ठोस माहिती आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. (Hasan Mushrif)

लेखापरीक्षक/सनदी लेखापाल म्हणून काम करत असताना अर्जदार गुरव यांनी पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रणालींचा वापर केला होता. तसेच हे पैसे शेल कंपन्यांमध्ये वळवले गेले, ज्यात हसन मुश्रीफ यांचे पुत्र संचालक असल्याचा आरोप आहे.

गुरव हे त्या कंपन्यांसाठी लेखा परीक्षक/सनदी लेखापाल म्हणून काम पाहत असल्याची माहिती विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी २७ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hasan Mushrif)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.