Mahadev App : बॉलिवूड सेलिब्रेटींनी घेतला धसका, जुगाराच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटी गायब

236
Mahadev App : बॉलिवूड सेलिब्रेटींनी घेतला धसका, जुगाराच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटी गायब
Mahadev App : बॉलिवूड सेलिब्रेटींनी घेतला धसका, जुगाराच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटी गायब

बॉलिवूड सेलिब्रेटीनी ईडीचा चांगलाच धसका घेतला आहे, ‘महादेव बुक ॲप’ प्रकरणात काही बॉलिवूड सेलिब्रेटींना ईडीचे समन्स गेल्यानंतर ऑनलाइन जुगार ॲपच्या जाहिरातीमधून बॉलिवूडचे सेलिब्रेटी गायब झाले आहे. (Mahadev App) महादेव बुक ऑनलाइन बेटिंग ॲप विरोधात ईडीने कंबर कसली आहे. दुबई येथून संचालित होणाऱ्या या ॲपचे महादेव बुक ॲपचे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे मुख्य सूत्रधार आहे. भारतात मोठ्या प्रमाणात महादेव बुकच्या ऑनलाइन ॲप माध्यमातून लाइव्ह लुडो, फुटबॉल, कॅसिनो गेम्स,ऑनलाइन सट्टेबाजी, टायगर एक्सचेंज, गोल्ड ३६५, लेझर२४७, क्रिकेटबझ.कॉम, प्ले २४७.विन, स्कायलेक्सचेंज.कॉम आणि क्रिकेटबेट.कॉम या सारख्या वेबसाइटवर बेटिंग ॲप्लिकेशन बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. (Mahadev App)

(हेही वाचा – Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, PMLA कोर्टाचे काय आहे निरीक्षण)

देशभरात या अँप्लिकेशनच्या छोटछोट्या फ्रँचायझी देण्यात आलेल्या असून यामध्ये ७०/३० असा फार्मूला ठरला आहे. याप्रकरणात छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश या राज्यात महादेव बुक ॲप्लिकेशन प्रकरणात शेकडो गुन्हे दाखल झालेले असून एकट्या छत्तीसगडमध्ये जवळपास ७० गुन्हे दाखल आहेत. हजारो कोटींचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार असलेल्या ऑनलाइन जुगार ॲप प्रकरणात ईडीने देखील मनी लोंडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. (Mahadev App)

महादेव बुकच्या विविध ऑनलाइन जुगार अँप्लिकेशनसाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात आलेल्या असून या जाहिरातीत बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्यांना या अँप्लिकेशनचे प्रमोशन करण्यासाठी मोठ्या रकमा देण्यात आलेल्या आहेत. हा सर्व व्यवहार रोखीने आणि हवालामार्फत करण्यात आलेल्या आहे, तसेच दुबईत २०२१ मध्ये झालेल्या महादेव ॲपचे प्रवर्तक सौरव सौरभ चंद्राकर याचा विवाह सोहळ्यात एका इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून भारतातून मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रेटीनी हजेरी लावली होती याचे पुरावे ईडीच्या हाती आले आहे. या पुराव्याच्या माध्यमातून ईडीने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हिना खान आणि हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीच्या समन्सनंतर अनेक बॉलिबुड सेलिब्रेटिनी धसका घेतला असून महादेव बुक ॲपच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या इतर ऑनलाइन जुगार ॲप्लिकेशनच्या जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड अभिनेते आणि सेलिब्रेटी या जाहिरातीतून गायब झाल्याचे दिसून येत आहे. (Mahadev App)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.