Venus Mission Isro : इस्रो आता उलगडणार ‘या’ ग्रहाचे रहस्य

135
Venus Mission Isro : इस्रो आता उलगडणार 'या' ग्रहाचे रहस्य
Venus Mission Isro : इस्रो आता उलगडणार 'या' ग्रहाचे रहस्य

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून भारताने इतिहास रचला आहे. (Venus Mission Isro) त्यापाठोपाठ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी निघालेली आदित्य एल 1 मोहीम यशस्वीपणे आपल्या गंतव्यस्थानाकडे वाटचाल करत आहे. या सगळ्यामध्ये इस्रोचे शास्त्रज्ञ ‘व्हीनस मिशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या मोहिमेत गुंतले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये हे मिशन सुरू होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – ICC World Cup 2023 : भारतीय संघाच्या सरावादरम्यान विराट कोहलीची मजेशीर धाव, व्हीडिओ व्हायरल

व्हिनस मिशन किंवा  व्हिनस मिशनच्या आधी इस्रोचे शास्त्रज्ञ एक्सपोसॅट किंवा एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहावर काम करत आहेत. तो या वर्षी डिसेंबरमध्ये प्रक्षेपित केला जाऊ शकतो. इस्रोचे संचालक एस सोमनाथ यांनीही सांगितले होते की, शुक्र मोहिमेपूर्वी आम्ही त्यावर काम करू जेणेकरून त्यात कोणताही अडथळा येणार नाही. डिसेंबर 2024 हाच कालावधी निवडण्यामागेही एक विशेष उद्देश आहे, त्यादरम्यान पृथ्वी आणि शुक्र दोन्ही ग्रह एका सरळ रेषेत असतील. अशा स्थितीत शुक्र मोहिम थोडी सहजतेने होईल. 2024 मध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला, तर 2031 हे या मोहिमेसाठी पूरक वर्ष आहे.  (Venus Mission Isro)

शुक्राची अनेक रहस्ये

इस्रोचे संचालक एस सोमनाथ शुक्राबद्दल म्हणले की, शुक्र हा एक मनोरंजक ग्रह आहे. त्याचे स्वतःचे वातावरण आहे, जे खूप दाट आहे.  जर आपण वातावरणाच्या दाबाबद्दल बोललो, तर ते पृथ्वीपेक्षा 100 पट जास्त आहे. आपण शुक्राच्या पृष्ठभागावर जाऊ शकत नाही. ते कठीण आहे की मऊ माहीत नाही. त्याविषयी काहीही स्पष्ट नाही.

शुक्र हा सूर्याच्या जवळ असलेला ग्रह आहे आणि पृथ्वीचा शेजारी आहे. त्याला पृथ्वीचा जुळा ग्रहदेखील म्हणतात. दोन्ही ग्रह घनता आणि आकारात समान आहेत. आतापर्यंत युरोपियन स्पेसने 2006 ते 2016 या कालावधीत व्हीनस एक्सप्रेस, जपानने अकात्सुकी व्हीनस क्लायमेट ऑर्बिटर आणि नासाने पार्कर सोलर प्रोब या मोहिमांद्वारे शुक्राचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. (Venus Mission Isro)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.