मुंबई उपनगरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कांजुर मार्ग डम्पिंग ग्राऊंड (Kanjur Marg Dumping Ground) बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. विक्रोळीत (Vikroli) पूर्व द्रुतगती मार्गावर शिंदे गटाने आंदोलन सुरू केलं आहे. शिवसेना विक्रोळी विधानसभा विभाग प्रमुख अनिल पांगारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून या डम्पिंग ग्राऊंडच्या संदर्भात स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या. डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचीही मागणी केली, मात्र अद्याप या डम्पिंग संदर्भात तोडगा काढण्यात आलेला नाही. अखेर डम्पिंग ग्राऊंडच्या समोरचा पूर्व द्रुतगती मार्गावरील रस्ता रोखून शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे.
(हेही वाचा : World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या दांड्या १५६ धावांत गूल; मेहदी हसनची महत्त्वपूर्ण खेळी)
पूर्व द्रुतगती मार्ग रोखण्यात आल्याने ठाण्याहून मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे कांजुर मार्ग ते मुलुंडपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आठ ते दहा दिवसात दुर्गंधी नाही कमी झाली तर जन आंदोलन करावे लागेल असाही इशारा त्यांनी दिला.
Join Our WhatsApp Community