Electricity Bill : ग्रामीण भागात ऑनलाईन विज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली

महावितरणच्या जळगाव परिमंडळाकडून ग्राहकांसाठी विविध सोयीसुविधांची उपलब्धता

207
Electricity Bill : ग्रामीण भागात ऑनलाईन विज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली
Electricity Bill : ग्रामीण भागात ऑनलाईन विज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडळात ऑनलाईन वीजबिल (Electricity Bill) भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये या फक्त एका महिन्यात परिमंडलातून ४ लाख ८१ हजार १३ ग्राहकांनी १०० कोटी ९ लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबिल भरणा (Online Electricity Bill) केला आहे.

ऑनलाईन वीजबिल भरल्यामुळे ग्राहकांचे रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या इतर कामांसाठी वेळ मिळतो. विशेष म्हणजे वीजयंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताणही कमी होतो.

(हेही वाचा  – Supreme Court : देशातील पहिल्या मूकबधीर वकील सारा सनी; सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय )

महावितरणकडून ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मराठी भाषेतूनही एसएमएसची (SMS) सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणीही (Registration of customer’s mobile number) सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ३ लाख १९ हजार १६५ ग्राहकांनी ५९.९७ कोटी रुपयांचा ऑनलाईन वीजबिल भरणा केला, तर धुळे जिल्ह्यातून १ लाख ६ हजार ६७७ ग्राहकांनी २८.५३ कोटी, तर नंदुरबार जिल्ह्यातून ५५ हजार १७१ ग्राहकांनी ११ कोटी ५९ लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा केला.

(हेही वाचा – Supreme Court : देशातील पहिल्या मूकबधीर वकील सारा सनी; सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  )

महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती…
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास टोल फ्री सेवा (Toll free service) उपलब्ध आहे. १९१२ आणि १८००२३३४३५ आणि १८००१०२३४३२ या क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन, मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.