-
ऋजुता लुकतुके
महिलांच्या पाठोपाठ पुरुषांच्या क्रिकेट संघानेही आशियाई स्पर्धेत सुवर्णाला गवसणी घातली. पण, सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि खेळ होऊ शकला नाही तेव्हा सरस क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आलं. भारतीय पथकाने सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये आशियाई क्रीडास्पर्धेत शनिवारी दोन सुवर्ण पदकं पटकावली. एक पुरुषांचं क्रिकेट आणि दुसरं पुरुषांच्याच कबड्डीत. पण, या दोन्ही सामन्यांमध्ये काही ना काही गोंधळ झाला. क्रिकेट संघ जिंकला पण, त्यांचा डाव पावसामुळे झालाच नसताना सरस क्रमवारीच्या आधारे त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. तर कबड्डीतील अभूतपूर्व गोंधळ तर आपण पाहिलाच आहे. (Asian Games 2023)
अर्थात, हे दोन्ही निकाल स्पर्धेच्या नियमांनुसार देण्यात आले.
Well done #TeamIndia! 🇮🇳
The @Ruutu1331-led side clinch a Gold 🥇 Medal at the Asian Games! 👏👏#IndiaAtAG22 | #AsianGames pic.twitter.com/UUcKNzrk0N
— BCCI (@BCCI) October 7, 2023
संपूर्ण सामन्यावर भारताचंच वर्चस्व होतं. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने सकाळी नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. अर्शदीपची सुरुवातीची गोलंदाजी अचूक आणि भेदक होती. शिवाय अफगाण फलंदाज सुरुवातीपासून फटकेबाजीच्या मूडमध्ये होते आणि त्या नादात त्यांनी विकेट फेकल्याही. त्यामुळे त्यामुळे अकराव्या षटकापर्यंत त्यांची अवस्था ५ बाद ५२ अशी बिकट झाली होती. (Asian Games 2023)
पण, शाहिदुल्लाच्या ४९ धावा आणि कर्णधार गुलबदन नैबच्या नाबाद २९ धावांच्या जोरावर अफगाण संघाने २० षटकांत ५ बाद ११५ अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे अर्शदीप, शिवम दुबे, रवी बिश्नोई आणि शाहबाझ खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
Asia Cup 🏆
Asian Games 🥇India 🇮🇳 domination 🔥
📸: BCCI/X#India #GoldMedal #AsianGames #Cricket #RuturajGaikwad #INDvsAFG #AsiaCup pic.twitter.com/OeObH6kpMy
— Wisden India (@WisdenIndia) October 7, 2023
(हेही वाचा – Western Railway : फुकटात गारेगार प्रवास करणाऱ्या ९३४ जणांवर कारवाई)
भारतासमोर ११६ धावांचं आव्हान होतं. पण, पावसामुळे भारतीय डाव होऊच शकला नाही आणि स्पर्धेचा नियम असं सांगतो की, एखादा डाव होऊच शकला नाही आणि डकवर्थ लुईसचा नियम लागू होणार नसेल तर पदक ठरवणाऱ्या सामन्यात जास्त क्रमवारी असलेला संघ विजयी घोषित करण्यात येईल.
भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि अफगाणिस्तान नवव्या. त्यामुळे भारतीय संघाच्या पदरात सुवर्ण आलं. विशेष म्हणजे कांस्य पदकाच्या लढतीत बांगलादेशने पाकिस्तानला ६ गडी राखून हरवलं. आणि क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पदकापासून वंचित राहावं लागलं. (Asian Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community