पॅलेस्टिनच्या दहशतवाद्यांनी अचानकपणे शनिवार, ६ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर ५ हजार रॉकेटच्या साहाय्याने हल्ला केला. तसेच इस्रायलचे सैनिक यांचे अपहरण केले. इस्त्रायल महिला सैनिकांची विवस्त्र धिंड काढली. यानंतर काही तासांतच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आम्ही युद्ध Israeli-Palestinian conflict घोषित करत आहोत, असे सांगत संपूर्ण गाझा पट्टी नेस्तनाबूत करण्याचा आदेश इस्त्रायलच्या सैनिकांना दिला.
⚡️To the citizens of Israel and the world, announcing Operation Iron Swords
“We are at war, Hamas will pay an unprecedented price at a force they have NEVER known”: #Israel PM Netanyahu officially declares WAR against Palestine and Gaza pic.twitter.com/wTqibasMFK
— The Tatva (@thetatvaindia) October 7, 2023
शत्रूला मोठी किंमत चुकवावी लागणार
पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने पॅलेस्टिनींना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. Israeli-Palestinian conflict अंतर्गत इस्त्रायलने आता गाझा पट्टीवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी इस्रायलच्या सैन्याने हमासविरोधात ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ सुरु केले आहे. याअंतर्गत डझनभर लढाऊ विमाने गाझा पट्टीतील दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बफेक करत आहेत. यावेळी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आता युद्ध पुकारले आहे. हे कोणतेही ऑपरेशन नाही. हमासने इस्रायलचे नागरिक आणि देशाविरोधात जिवघेणा हल्ला केला आहे. मी सर्वात आधी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या संपविण्याचे आदेश देले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविण्यास सांगितले आहे. आता शत्रूला अशी किंमत चुकवावी लागणार आहे, ज्याबाबत त्याने विचारही केला नसेल, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे.
पॅलेस्टिनींचा जमीन आणि हवेतून हल्ला
पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेतली. याशिवाय पाच इस्रायली सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यूंच्या सुट्टीच्या काळात गाझामधून इस्रायलवर संयुक्त हल्ला होतो. हमासच्या दहशतवाद्यांकडून रॉकेट आणि जमिनीवर घुसखोरी करण्यात आली आहे. हा सामान्य हल्ला नाहीय, इस्रायल नक्कीच जिंकेल असे इस्त्रायलच्या भारतातील दूतावासाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community