नेत्र रोग तज्ज्ञांनी डोळ्यांच्या लाईव्ह शस्त्रक्रियेला (Eyes live surgery) विरोध केलेला असूनही अखिल भारतीय नेत्र रोग सोसायटीच्या एका संमेलनात (All India Ophthalmological Society) (AIOS) लाइव्ह शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे.
एका शिबिरात नेत्रतपासणी केल्यानंतर एका रुग्णावर २०१६ साली लाईव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर लाईव्ह शस्त्रक्रियेला प्रतिबंध करण्यात आला होता, मात्र आता पुन्हा अशा पद्धतीने शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती समोर आली असून बहुतांश वरिष्ठ नेत्र रोग तज्ज्ञांनी अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेला पुन्हा विरोध केला आहे.
डोळ्यांच्या लाईव्ह शस्त्रक्रियेला फेब्रुवारी २०१६ साली भारतीय नेत्र रोग सोसायटीच्या एका सर्वसाधारण सभेत (GBM) घेण्यात आला होता. या सोसायटीमध्ये अंदाजे २३,००० सदस्य आहेत. अनेक नेत्ररोग तज्ज्ञांनी या योजनेला तीव्र विरोध केल्यामुळे AIOS चे विद्यमान पदाधिकारी 18 सप्टेंबर रोजी विशेष GBM द्वारे थेट शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे पाऊल उचलू शकले नाहीत. संघटनेने बंदी उठवण्याचा प्रस्ताव दिला होता.
(हेही वाचा – Afghan Embassy : भारतातील अफगाणिस्तानच्या दूतावासाविषयी मोठा निर्णय; परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत चर्चा )
एआयओएसचे अध्यक्ष डॉ. हरवंश लाल याविषयी म्हणाले की, विशेष जनरल बॉडी मिटिंगमध्ये (GBM) या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली, मात्र यामध्ये AIOS सदस्यांची उपस्थिती फारच कमी होती, त्यामुळे सामान्य सदस्यांच्या एकत्रित मत विचारात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे सार्वमत विचारात घेण्यापूर्वी विशाखापट्टणममधील मध्यावधी परिषदेच्या मांडणी नकाशात थेट (लाइव्ह) शस्त्रक्रिया सत्रे दाखवण्यात आली होती. याकरिता ५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी गव्हर्निंग कौन्सिल उपसमिती आणि व्यवस्थापकीय समितीने मध्यावधी बैठकीत थेट (लाइव्ह) शस्त्रक्रिया सुरू करण्यास यापूर्वीच एकमताने मान्यता दिली होती. हा निर्णय AIOS जनरल बॉडीच्या औपचारिक मंजुरीसाठी प्रलंबित होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community