इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter), Youtube आणि Telegramला नोटिस पाठवली आहे. त्यांना भारतीय इंटरनेटवरील त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बाल लैंगिक शोषणासंबंधी असलेला मजकूर (Child Sexual Abuse) काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) सोशल मिडियावरील बाल लैंगिक शोषण कंटेटमध्ये २५० ते ३०० टक्के वाढ झाल्याच्या मीडिया रिपोर्टसची दखल घेतली होती. दिल्लीचे पोलीस आयुक्त, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस महासंचालक (डीजीपी), नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स सचिव यांना यासंदर्भात नोटिस पाठवण्यात आली होती.
(हेही वाचा – Asian Games 2023 : पुरुषांच्या कबड्डी अंतिम सामन्यात अभूतपूर्व गोंधळ, अखेर भारत विजयी घोषित)
याबाबत राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, ‘आम्ही X, YouTube आणि Telegram’ला त्यांच्या प्लॅटफार्मवर बाल लैंगिक अत्याचाराचा मजकूर नसल्याची खात्री करण्यासाठी नोटिस बजावली आहे. आयटी नियमांनुसार, सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट तयार करण्याचे काम सरकार करत आहे. आयटी नियमांनुसार सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी किंवा हानिकारक पोस्टला परवानगी देऊ नये. जर त्यांनी त्वरित कारवाई केली नाही, तर आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
पीआयबीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोदी सरकारने दिलेल्या नोटिसीचे पालन न केल्यास आयटी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तंत्रज्ञान मंत्रालयाच्या या नोटिसांमध्ये असे नमूद केले आहे की, या नियमांचे पालन न करणे हे आयटी नियम, २०२१ च्या नियम ३ (१) (B) आणि नियम ४ (४)चे उल्लंघन मानले जाईल.
हेही पहा –