ICC World Cup 2023 : पाकिस्तानच्या सामन्या दरम्यान हैद्राबादी प्रेक्षकांनी केला पाक कर्णधार बाबर आझमच्या नावाचा जयघोष, बाबरनेही दिलं समर्पक उत्तर

सामना संपल्यानंतरही बाबर आझमने भारतीय प्रेक्षकांकडून झालेल्या कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

136
ICC World Cup 2023 : पाकिस्तानच्या सामन्या दरम्यान हैद्राबादी प्रेक्षकांनी केला पाक कर्णधार बाबर आझमच्या नावाचा जयघोष, बाबरनेही दिलं समर्पक उत्तर
ICC World Cup 2023 : पाकिस्तानच्या सामन्या दरम्यान हैद्राबादी प्रेक्षकांनी केला पाक कर्णधार बाबर आझमच्या नावाचा जयघोष, बाबरनेही दिलं समर्पक उत्तर
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम भारतीय प्रेक्षकांचा लाडका आहे. हैद्राबादमध्ये प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. त्याला बाबरने कसं उत्तर दिलं पाहूया… (ICC World Cup 2023)

पाकिस्तानचा क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात आला तेव्हापासून त्यांचं स्वागतही होतंय आणि मेहमाननवाजीही. ते राहत असलेल्या हॉटेलमधील मेन्यूही अलीकडेच बाहेर आला होता आणि हैद्राबादी बिर्याणीवरून सोशल मीडियावर मजेदार चर्चाही रंगली. (ICC World Cup 2023)

आता शनिवारी (७ ऑक्टोबर) पाकिस्तानचा संघ नेदरलँड्‌सविरुद्ध आपला स्पर्धेतील पहिला सामना खेळला. यावेळीही मैदानातील प्रेक्षकांनी पाकिस्तान संघाला बऱ्यापैकी पाठिंबा दिला. पाकिस्तानने हा सामना ८१ धावांनी जिंकला. पाक कर्णधार बॅटने फारशी चमक दाखवू शकला नाही. पण, प्रेक्षकांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. (ICC World Cup 2023)

पाक संघ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांमधून बााबर आझमच्या नावाचा जयघोष ऐकू येत होता आणि बाबरनेही कानावर हात ठेवून हे कौतुक नम्रपणे स्वीकारलं. आधी हा व्हीडिओ पाहूया… (ICC World Cup 2023)

(हेही वाचा – Israeli-Palestinian conflict : भारताने इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी केली जारी)

सामना संपल्यानंतरही बाबर आझमने भारतीय प्रेक्षकांकडून झालेल्या कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बाबर म्हणला, ‘हैद्राबाद शहराने आम्हाला जो पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आमचा संघही भारतात होणारी मेहमान नवाजी नम्रपणे स्वीकारत आहे. स्पर्धेत आमची सुरुवात चांगली झाली हे खूप चांगलं झालं. सौफची फलंदाजी आणि गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये मिळवलेले बळी यामुळे पहिला सामना आम्ही जिंकू शकलो.’ (ICC World Cup 2023)

या सामन्यात पाकचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले असताना एक बाजू लावून धरणारा सौद शकील सामनावीर ठरला. त्याने ५२ चेंडूत ६८ धावा केल्या. (ICC World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.