Israeli-Palestinian conflict : भारताने इस्रायलला दिला नैतिक पाठिंबा; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

158

गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी इस्त्राईलमध्ये घुसखोरी केली, तसेच ५ हजार रॉकेटचा मारा केला. यामध्ये इस्रायलचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी अमेरिकाने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे.

(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : आम्ही युद्ध पुकारले आहे; गाझा पट्टी नेस्तनाबूत करणार; काय म्हणाले बेंजामिन नेतन्याहू?)

नरेंद्र मोदी यांनी काय केले ट्विट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.

(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : भारताने इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी केली जारी)

यावर इस्रायलच्या भारतातील दुतावासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नैतिक पाठिंब्यामुळे भारताचे आभार मानले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.