भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर (Vikram Lander) आणि प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) निद्रावस्थेत गेल्यानंतर आता ते पुन्हा जागृत होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याचे मत ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी व्यक्त केले.
अंतराळ आयोगाचे सदस्य आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) ( ISRO ) माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, हे लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता दिसत नाही. आता ते घडण्याची शक्यता नाही, कारण आतापर्यंत ते केव्हाच सक्रीय झाले असते.
इस्त्रोने २२ सप्टेंबर रोजी म्हटले होते की, सौर ऊर्जेवर चालणार विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना पुन्हा कार्यन्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून अद्याप तरी कोणतेही संकेत मिळाले नाहीत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान -३चे विक्रम लँडर यशस्वीरित्या उतरले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर लँडर उतरणारा भारत (India) हा पहिलाच देश ठरला आहे. त्याप्रमाणे चांद्र भूमीवर सॉफ्ट लँडिंग (Soft landing) साध्य करणारा भारत हा अमेरिका आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे.
(हेही वाचा – Israeli-Palestinian conflict : भारताने इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी केली जारी )