Worli 141 Tenements : वरळीतील १४१ टेनामेंट्सचा वनवास संपला

परंतु यापूर्वी नियुक्त केलेल्या विकासकाने याच्या पुनर्विकासाचे काम न केल्याने रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्थेने त्या विकासकाला बाजुला करून नवीन विकासकाची नियुक्ती केली आहे.

340
Worli 141 Tenements : वरळीतील १४१ टेनामेंट्सचा वनवास संपला
Worli 141 Tenements : वरळीतील १४१ टेनामेंट्सचा वनवास संपला

वरळीतील (Worli) डॉ ई मोझेस रोडवर (Dr E Moses Road) असलेल्या १४१ टेनामेंट्सचा (Tenements) अखेर १४ वर्षांचा वनवास संपला असून सन २००९पासून या इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली होती. परंतु यापूर्वी नियुक्त केलेल्या विकासकाने याच्या पुनर्विकासाचे काम न केल्याने रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्थेने त्या विकासकाला बाजुला करून नवीन विकासकाची नियुक्ती केली आहे. या नविन विकासक नेमणुकीला महापालिकेने मंजुरी दिली आहे. या नव्या विकासामध्ये १७९ वाहनांकरता वाहनतळ तयार केले जाणार आहे. त्यामुळे तब्बल १४ वर्षांनंतर अखेर या इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे पहायला मिळत आहे. (Worli 141 Tenements)

वरळीतील इंजिनिअर्स हब शेजारी असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर १४१ म्युनिसिपल टेनामेंट्स उभी आहे. यामध्ये ५४ रहिवाशी व ७ अनिवासी भाडेकरून तसेच सफाई कामगारांची ११८ सदनिका आणि नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ४२ कर्मचाऱ्यांच्या सेवा सदनिका आहेत. अशापध्दतीने या संपूर्ण भूखंडावर एकूण ६१ भाडेकरून आणि १६० कर्मचारी निवासस्थाने आहे. या जागेवरील बैठ्या चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी १४१ म्युनिसिपल टेनामेंट्स भाडेकरू सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत नावाची संस्था स्थापन करून त्यांनी विकासक म्हणून यश एंटरप्रायझेस व वास्तूविशारद म्हणून एस. जी. दळवी आणि एसोसिएट्स यांची नियुक्ती केली होती. (Worli 141 Tenements)

या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीव महापालिकेने डिसेंबर २००९ मध्ये मंजुरी दिली. यानंतर या विकासकाने एकूण भांडवली मूल्याच्या २० टक्के म्हणजे १०.०७ कोटी रुपये एप्रिल २०१०मध्ये भरणा केली. त्यानंतर या प्रकल्पाचा कालावधी एप्रिल २०१५ पर्यंत वाढवण्यात आला होता. परंतु या भूभागाचा विकास होत नसल्याने अखेर या गृहनिर्माण संस्थेने फेब्रुवारी २०२३मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये यापूर्वी नेमलेल्या यश एंटरप्रायझेस या विकासकाची नियुक्ती रद्द करून त्याजागी स्पार्क रियल हाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती केली. मागील दहा वर्षांत विकासक हा प्रकल्प नेण्यास असमर्थ ठरल्याने त्यांची नियुक्ती रद्द करून नवीन विकासकाची नियुक्ती संस्थेने केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर याबाबतचा जुना ठराव रद्द करून नवीन नियुक्तीच्या प्रस्तावाला प्रशासक सुधार समिती व प्रशासक महापालिका यांनी मंजुरी दिली आहे. (Worli 141 Tenements)

(हेही वाचा – ISRO : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागृत होण्याची शक्यता नाही, इस्त्रोच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केले मत)

या १४१ टेनोंटमेंट्सचे एकूण क्षेत्रफळ हे ५३७५. ०० चौरस मीटर एवढे आहे. त्यापैकी मलप्रवास सुविधांसाठी १३९ चौरस मीटर आणि एमएमआरसीएल यांना हस्तांतरीत केलेला ६७.५० चौरस मीटरचा भूभाग वगळता निव्वळ क्षेत्रफळ हे ५१७१ एवढे पुनर्विकासासाठी उपलब्ध होत आहे. या नविन पुनर्विकास प्रकल्पात ३३(७) ३३ (१८)च्या एकत्रित पुनर्विकासाला महापालिकेची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार निवासी व अनिवासी इमारतींसह एकूण ३ तळघर अधिक ४ पोडियम अशाप्रकारच्या एकूण १७९ वाहनांच्या पार्किंगसाठी जागा असणार आहे. विद्यमान इमारती पाडल्यापासून सहा महिन्यांच्या आत बांधकामाला सुरुवात केली जाईल. आणि पुनर्विकास योजनेचे बांधकाम सुरु करण्याचे प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत जे लवकर असेल त्या दिनांकापासून सहा वर्षांच्या आत प्रकल्पाचे काम पूर्ण करेल. त्यामुळे १४१ म्युनिसिपल टेनामेंट्स भाडेकरू सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच विक्रीच्या घटकातील सदनिका खरेदीदारांच्या संस्थेबरोबर पुनर्वसन इमारत व विक्रीच्या इमारतींच्या स्वतंत्र बांधकाम घटकांचे संयुक्त इमारतींचे बांधकाम करून या मालमत्तेकरता स्वतंत्र भाडेपट्टा देण्यासही प्रशासक सुधार समिती व महापालिका यांनी मागील महिन्यात मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे. (Worli 141 Tenements)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.