Israel-Palestine War कोणता देश कोणाच्या पाठीशी ?

196
Israel-Palestine War कोणता देश कोणाच्या पाठीशी ?
Israel-Palestine War कोणता देश कोणाच्या पाठीशी ?

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या संघर्षामुळे जग दोन छावण्यांमध्ये विभागले आहे. दोन्ही बाजूंकडून आक्रमक कारवाई सुरू असून हा रक्तरंजित संघर्ष थांबलेला नाही. निष्पाप मुलांसह अनेक नागिरकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. या यु्द्धाकडे जगाचे लक्ष लागले असून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. अशावेळी कोणता देश कोणत्या देशाच्या पाठीशी मदतीच्या भावनेने उभा आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

वाद मिटवण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न 

पॅलेस्टिनींच्या रॉकेट हल्ल्यांविरुद्ध इस्त्रायलच्या स्वसंरक्षणासाठी अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. अमेरिका इस्त्रायलच्या जवळ आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाद मिटवण्यासाठी येथे राजकीय स्तरावर अमेरिका प्रयत्न करत आहे. युरोपीय देशांपैकी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ब्रिटनमध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मागण्या आणि निदर्शने केल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन यांनी कठोर भूमिका घेतली.

दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन

त्यांनी ट्विटरद्वारे शेअर केले आहे की, “आमच्या समाजात धर्मांधतेला स्थान नाही. मी ब्रिटनच्या ज्यूंच्या पाठीशी उभा आहे.” फ्रान्समध्येही पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. यावेळी आंदोलनांवर बंदी असल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाचा बचाव केला, मात्र फ्रान्सने इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनाही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

जर्मनी इस्त्रायल्या पाठीशी…
जर्मनीही इस्त्रायलच्या समर्थनार्थ उभा राहिला असून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ऑस्ट्रेलिया, अल्बेनिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, सायप्रस, जॉर्जिया, हंगेरी, इटली, स्लोव्हेनिया आणि युक्रेनसह त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या २५ देशांचे त्यांनी आभार मानले आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आवाहन केले. इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाचा बचाव केला, पण पॅलेस्टिनींच्या सुरक्षेची चिंताही व्यक्त केली.

काही देशांचे संघर्षावर मत नाही…
पॅलेस्टिनी आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात काही देश असेही आहेत, ज्यांनी स्वत:चे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. या देशांना मध्यम मार्गाचा अवलंब केला आहे. भारताने या मुद्द्यावर कोणत्याही बाजूने समर्थन केले नाही किंवा बाजू घेतली नाही. दोन्ही देशांमधील चांगले संबंध पाहता दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

रशियाने व्यक्त केली चिंता
रशियाने या युद्धामुळे स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील संघर्षामुळे आपल्या सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे रशियाने म्हटले आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्षाच्या आडून चीनने अमेरिकेला लक्ष्य केले आहे.

इस्लामिक देशांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा…
इस्लामिक देशांनी इस्रायलच्या कारवाईवर तीव्र आक्षेप व्यक्त केला. सौदी अरेबिया, तुर्की, इराण, पाकिस्तान, कुवेत आणि अनेक आखाती देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी एक पाऊल पुढे टाकत इस्रायलला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, “संपूर्ण जग शांत झाले तरी तुर्की आवाज उठवत राहील.” तुर्कीने इस्रायलवर निर्बंध घालण्याची मागणीही केली होती. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ते पॅलेस्टिनींच्या पाठीशी उभे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पॅलेस्टाईनमधील सर्व प्रकारचा ताबा संपवण्याचे समर्थन केले. इराणने संयुक्त राष्ट्र आणि इस्लामिक देशांकडे इस्रायलला पॅलेस्टाईनवर हल्ले करण्यापासून रोखण्याची मागणी केली. पॅलेस्टिनींवरील हल्ल्यांविरोधात पाकिस्ताननेही इस्रायलवर उघडपणे टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.