Abu Azami : अबू आझमींचे घबाड सापडले; अडचणी वाढल्या 

193

दोन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले, आता ही कारवाई थांबवण्यात आली. मागील तीन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड सापडले आहे. आयकर विभागाने बाबतपूर विमानतळाजवळीत कोट्यवधींची जमीन, बोगस फॉर्म, नातेवाईकांच्या नावे फ्लॅट्स आणि जमिनीची महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

आयकर विभागाच्या टीमला निकटच्या बिल्डरांसोबत व्यवहाराचे बँक स्टेटमेंट आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीद्वारे सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बेनामी संपत्ती सापडली. मालदहिया येथील विनायक प्लाझा आणि आझमगढच्या काही निकटच्या लोकांची नावे आयकर विभागाच्या छाप्यात समोर आली. लखनऊचे अतिरिक्त आयकर संचालक डीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तपासासाठी पोहोचली होती. या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले. आझमगड येथील काही निकटवर्तीयांच्या नावावर, बाबतपूर विमानतळाजवळील मौल्यवान जमिनी, बोगस फर्म्स, विनायक प्लाझामधील दुकाने, शिवपूरच्या वरुणा गार्डनमधील फ्लॅट्स घेतले आहेत. अबू आझमींच्या (Abu Azami) छुप्या ठिकाणांवर पाच वर्षांत तिसऱ्यांदा छापे टाकण्यात आले आहेत, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : तिसरे महायुद्ध सुरु झालंय; काय म्हणाले ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.