Israel-Philistine War : इस्त्रायलला भारताकडून मिळाला पाठिंबा, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली प्रतिक्रिया

213
Israel-Philistine War : इस्त्रायलला भारताकडून मिळाला पाठिंबा, पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे केली प्रतिक्रिया
Israel-Philistine War : इस्त्रायलला भारताकडून मिळाला पाठिंबा, पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे केली प्रतिक्रिया

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर (Israel-Philistine War) केलेल्या हल्ल्यावर जगभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Prime Minister Narendra Modi)  अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांनी इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे.

या हल्ल्याबद्दल इराणने हमासचे अभिनंदन केले आहे, तर दुसरीकडे कतारने पॅलेस्टिनी लोकांवरील हिंसाचारासाठी इस्त्रायली लष्कराला जबाबदार धरले आहे, तर पाकिस्ताननेही या हल्ल्याचे उघड समर्थन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली भावना…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाबाबत ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, इस्त्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या भावना आणि प्रार्थना या युद्धात निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. आम्ही या कठीण काळात एकजुटीने त्यांच्या पाठीशी आहोत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन संरक्षाणासाठी वचनबद्ध …
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्त्रायलचे अध्यक्ष हर्जोग आणि पंतप्रधान नेत्यनाहू यांच्यासोबत चर्चा केली. हर्जोग यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, इस्त्रायल तेथील सैनिक आणि लोकांवर केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. फ्रान्स इस्त्रायल आणि इस्त्रायलच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.