Airfare Hike : इंडिगो कंपनीने वाढवलं विमानाचं भाडं, इतर कंपन्याही करणार भाववाढ

इंडिगो या देशांतर्गत विमान प्रवासातील आघाडीच्या कंपनीने विमान तिकीट किमान ३०० रुपयांनी वाढवलं आहे.

142
Airfare Hike : इंडिगो कंपनीने वाढवलं विमानाचं भाडं, इतर कंपन्याही करणार भाववाढ
Airfare Hike : इंडिगो कंपनीने वाढवलं विमानाचं भाडं, इतर कंपन्याही करणार भाववाढ

इंडिगो या देशांतर्गत विमान प्रवासातील आघाडीच्या कंपनीने विमान तिकीट किमान ३०० रुपयांनी वाढवलं आहे. इतर कंपन्याही त्याच वाटेवर आहेत. देशांतर्गत विमान प्रवास क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी इंडिगो एअरलाईन्सने विमान तिकिटावरील इंधन शुल्क ३०० रुपयांनी वाढवलं आहे. ६ ऑक्टोबरला एव्हिएशन टर्बाईन इंधनाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम विमान तिकीट महाग होण्यात होणार आहे आणि इतर विमान कंपन्याही याच वाटेवर आहेत. (Airfare Hike)

‘विमान इंधनाच्या किमतीत मागच्या तीन महिन्यात सातत्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेली ही तिमाहीतील तिसरी भाववाढ आहे. अशावेळी विमानसेवा चालवण्याचा खर्चही वाढतोय. अशावेळी आम्हालाही दरवाढ करण्या वाचून पर्याय नाही,’ असं कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. इंधन शुल्कातही वाढ ही अंतरावर अवलंबून असेल. ० ते ५०० किमीसाठी इंधन शुल्क ३०० रुपयांनी वाढेल. तर ५०१ ते १००० पर्यंतच्या अंतरासाठी हे शुल्क ४०० रुपयांनी वाढेल. त्याच्या पुढील टप्प्यांसाठी इंधन शुल्कात ५५०, ६५०, ८०० आणि १००० रुपयांची वाढ होईल. (Airfare Hike)

(हेही वाचा – Israel-Philistine War : इस्त्रायलला भारताकडून मिळाला पाठिंबा, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली प्रतिक्रिया)

ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्याचाच परिणाम एकट्या ऑक्टोबर महिन्यात एव्हिएशन टर्बाईन इंधनाच्या किमती तर चारदा वाढल्या आहेत. आणि शेवटची भाववाढ ५ टक्क्यांची आहे. त्याचा परिणाम म्हणून विमान कंपन्यांना आता तिकीटात दरवाढ करणं अनिवार्य झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. इंडिगो पाठोपाठ इतर भारतीय विमान कंपन्याही इंधन शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत. (Airfare Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.