Thane Shiv Sena: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने…

ठाकरे गटातर्फे ठाण्यात ठिकठिकाणी 'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे येत आहे

227
Thane Shiv Sena: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने...
Thane Shiv Sena: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने...

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीन ठाण्यात ‘होऊ दे चर्चा’ (hovu de charcha programme)  (Thane Shiv Sena) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकामेकांसमोर आल्याने त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत घातल्यामुळे तणावयुक्त परिस्थिती आटोक्यात आली.

ठाकरे गटातर्फे ठाण्यात ठिकठिकाणी ‘होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत चौकाचौकांत ठाकरे गटाचे कार्यकर्ते चौकसभा घेऊन सरकारवर निशाणा साधत आहेत. ठाण्यातील हाजुरीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते येताच स्थानिक नागरिक आणि शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. हाजुरीत राजकीय वातावरण बुडवू नका, असे म्हणत या कार्यक्रमाला विरोध केला. यावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही गटातील वाद वाढू लागल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर तणाव निवळून ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथून निघून गेले.

(हेही वाचा –BJP : मोदी-शहानंतर फायरब्रॅंड योगी ‘इन-डिमांड’)

याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड (Senior Police Inspector Jitendra Rathod) यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतल्याने कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून ठाकरे गटाला पर्यायी जागा देण्यात आली. त्यामुळे सध्या तरी वाद निवळला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.