हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू आहे. (Israel-Palestine Conflict) दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते. हमासने रात्री पुन्हा १५० क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण इस्रायलच्या काही भागांमध्ये लष्कर अजूनही हमासशी लढण्यात गुंतले आहे आणि देशातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीत, प्रवक्त्याने असेही सांगितले की, हमासने गाझाजवळील इस्रायली शहरांवर शनिवारी केलेल्या अचानक हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक आणि लष्करी जवानांना ओलीस ठेवले आहे. ज्यामुळे युद्ध अटळ आहे. (Israel-Palestine Conflict)
(हेही वाचा – ICC World Cup 2023 : चेन्नईत कडक उन्हात रंगणार भारतीय फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज अशी लढत)
इस्रायलमध्ये रविवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्त्राईलमध्ये रविवारी शाळेला सुट्टी नसते. इस्रायली रक्तपेढी रक्तदानासाठी विचारणा करत आहे. साडेपाच दशलक्ष इस्रायली सामाजिक आश्रयस्थानात आहेत. अन्य नागरिकांना घरामध्येच राहण्यास सांगितले आहे किंवा सुरक्षा क्षेत्रांच्या जवळ राहण्यास सांगितले आहे. (Israel-Palestine Conflict)
इस्रायली नागरिक ओलीस
शनिवारची सकाळ इस्रायलसाठी ऐतिहासिक शोकांतिका घेऊन आली. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले. गेल्या २४ तासांत या संघर्षात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 300 इस्रायली लोक मारले गेले आहेत, तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये 230 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 3500 च्या वर गेली आहे. याआधी हमासने दावा केला होता की, त्यांनी अनेक इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवले होते. अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचीही माहिती आहे. हमासने या कारवाईला ‘अल-अक्सा फ्लड’ म्हटले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने ‘युद्ध’ जाहीर केले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, त्यांच्या देशाच्या शत्रूला अभूतपूर्व किंमत चुकवावी लागेल. इस्रायलने आपल्या शत्रूविरुद्ध ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ सुरू केले आहे.
इस्रायलने काउंटर ऑपरेशन ‘आयर्न स्वॉर्ड्स’ सुरू केले. इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) सांगितले की, हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ सुरू केले आहे. याद्वारे गाझा पट्टीवर हवा, जमीन आणि समुद्रातून रॉकेट डागले जात आहेत. नेतन्याहू म्हणाले की, आम्ही युद्धात आहोत, कोणत्याही ऑपरेशनमध्ये नाही. हमासने 17 लष्करी छावण्या आणि 4 मुख्यालयांवर हल्ला केला. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community