Indian Air Force Day : जाणून घ्या भारतीय वायूदल सेनेची स्थापना कधी झाली?

173
Indian Air Force Day : जाणून घ्या भारतीय वायूदल सेनेची स्थापना कधी झाली?

भारतीय वायुसेना (Indian Air Force Day) ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते. ‘नभ:स्पृशं दीप्तम्।’ हे वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे. भगवद्गीता मधील एका श्लोकावरून हे वाक्य घेण्यात आले आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले होते.

या ध्येवाक्याचा (Indian Air Force Day) अर्थ असा आहे की; ‘हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.’

वायुदलाचा स्थापना दिवस

ऑक्टोबर ८, १९३२ रोजी भारतीय हवाई दल दिन (Indian Air Force Day) साजरा केला जातो. यावर्षी हवाई दलाचा ९१ वा वर्धापन दिन आहे. भारताच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त, भारतीय हवाई दल आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मोहिमांसाठी आपल्या सेवा पुरवते, जसे की परदेशी भूमीतून भारतीयांना बाहेर काढणे किंवा देशात अडकलेल्या नागरिकांना विमानाने बाहेर काढणे.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : रात्रभर रॉकेटचा वर्षाव; इस्रायल आणि गाझा पट्टीच्या अवकाशात धुराचे लाेळ)

भारतीय हवाई दलाचा इतिहास

भारतीय वायुसेनेची (Indian Air Force Day) पहिली तुकडी १ एप्रिल १९३३ रोजी आर. ए. एफ. प्रशिक्षित ६ अधिकारी आणि १९ वायू सैनिकांसह स्थापन करण्यात आली. स्क्वाड्रनला ४ वेस्टलँड वापिती IIA विमाने देण्यात आली होती, जी लष्करी सहाय्य विमाने होती. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय हवाई दलाचे तंत्रज्ञान आणि क्षमता वर्षानुवर्षे सुधारत गेली.

पहिले हवाई दल प्रमुख, एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट

स्वातंत्र्यानंतर हवाई दलाला सैन्यापासून मुक्त (Indian Air Force Day) करण्याचे श्रेय भारतीय हवाई दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ, एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट यांना जाते. एल्महर्स्ट १५ ऑगस्ट १९४७ ते २२ फेब्रुवारी १९५० पर्यंत पदावर राहिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.