Infinix Note 30 VIP : मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं चार्ज करू शकणारा हा मोबाईल कुठला? काय आहेत वैशिष्ट्यं आणि किंमत

इन्फिनिक्स नोट मोबाईल फोनवरून तुम्ही दुसरा फोन चार्जही करू शकता. हा फोन नेमका कसा वापरायचा? त्याची किंमत काय जाणून घेऊया… 

162
Infinix Note 30 VIP : मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं चार्ज करू शकणारा हा मोबाईल कुठला? काय आहेत वैशिष्ट्यं आणि किंमत
Infinix Note 30 VIP : मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं चार्ज करू शकणारा हा मोबाईल कुठला? काय आहेत वैशिष्ट्यं आणि किंमत

ऋजुता लुकतुके

५जी नंतरचा उच्च तंत्रज्जानाचा किफायतशीर अविष्कार म्हणून इन्फिनिक्स नोट ३० व्हीआयपी (Infinix Note 30 VIP) हा फोन ओळखला जातो. मोबाईल सतत चार्ज करायला लागतो म्हणून वैतागलेल्या लोकांसाठी इन्फिनिक्स या कंपनीने एक खास मोबाईल फोन बाजारात आणला आहे. हा फोन आतापर्यंतचा सगळ्यात जलद चार्ज होणारा फोन म्हणून ओळखला जातो. आणि त्याचबरोबर हा फोन इतर मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंना चार्जही करू शकतो. म्हणूनच इन्फिनिक्स कंपनीच्या फोनना ५जी नंतरचा क्रांतिकारी फोन समजलं जातं. कारण, स्मार्ट चार्ज असलेला हा फोन स्मार्ट किमतीत उपलब्ध आहे.

अलीकडेच कंपनीने इन्फिनिक्स नोट ३० व्हीआयपी या फोनची खास एडिशनही लाँच केली आहे. बीएमडब्ल्यू कंपनीबरोबर करार करून कंपनीने आपल्या रेसिंग एडिशनमध्ये रात्रीच्या वेळी रेसिंग कारचे स्पष्ट फोटो घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. थोडक्यात तंत्रज्झानात उजवा असा हा ५जी स्मार्ट फोन आहे. त्याची किंमत ही अवाक्यातली असल्यामुळे तो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.

फोनची ३,००० एमएएच क्षमतेची बॅटरी प्लग-इन केलेल्या चार्जरने अर्ध्या तासात फोन पूर्ण चार्ज करू शकते. तर वायर नसलेलं म्हणजेच युएसबी चार्जिंग असेल तर फोन पूर्ण चार्ज व्हायला एक तास लागू शकतो.

(हेही वाचा-Israel-Palestine Conflict : इस्रायलमधील भारतीय विद्यार्थी दूतावासाच्या संपर्कात; सांगितले भीतीदायक अनुभव )

बायपास चार्जिंग 

या शिवाय फोनमध्ये असलेली एक विलक्षण सुविधा म्हणजे बायपास चार्जिंग. फोन ३० टक्के चार्ज झाला की, बॅटरी चार्ज व्हायची थांबते. आणि थेट मदरबोर्डला वीजपुरवठा सुरू होऊन फोन थेट काम करू लागतो. जास्त क्षमतेचे व्हीडिओ गेम खेळण्यासाठी हे फिचर खूपच उपयुक्त आहे. कारण, यामुळे चार्जिंग होताना फोन कमी तापतो.

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्या १००० चार्जिंग नंतरही फोनची बॅटरी ८५ टक्क्यांपर्यंत आपली क्षमता टिकवून ठेवते. इतर फोनच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी जास्त आहे. कारण, कुठलीही बॅटरी सतत चार्ज केल्याने आपली ऊर्जा साठवणुकीची क्षमता गमावत असते. इन्फ्लिक्स कंपनीच्या फोनमध्ये हा धोका नाही. चांगल्या बॅटरीसाठीच हा फोन ओळखला जातो.

इन्फ्लिक्स नोट ३० व्हीआयपी फोनची फिचर्स 

६.७ इंचांचा डिस्प्ले या फोनला आहे. आणि डिस्प्लेची स्पष्टता १०८० बाय २४०० मेगापिक्सेल इतकी आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळीही फोनचा डिस्प्ले चांगला राहू शकतो. फोनची प्रखरता ९०० निट पीक इतकी आहे.

फोनला १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आलाय. आणि यात २ मेगा पिक्सेलचे दोन सेन्सरही आहेत. सेल्फी घेण्यासाठी ३२ मेगापिक्सेलचा खास कॅमेरा आहे.

चांगल्या आवाजासाठी फोनमध्ये जेबीएलचे डुआल स्पीकर आहेत. तसंच स्क्रीनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी यात आयपी५थ्री प्रोटेक्शनही आहे. थोडक्यात तरुणाईला आवडेल असा गेमिंगचा वेगळा अनुभव देणारा हा फोन आहे.

इन्फ्लिक्स नोट ३० व्हीआयपीची किंमत किती? 

हा फोन उच्च तंत्रज्जानाबरोबरच किफायतशीरही आहे. सध्या मॅजिक ब्लॅक बरोबरच ग्लेशियर ब्लू रंगात हा फोन उपलब्ध आहे. ८ तसंच १२ जीबी रॅममध्ये हा फोन उपलब्ध आहे. आणि फोनची साठवणूक क्षमता ६४ जीबी, १२८ जीबी तसंच ५१२ जीबी इतकी आहे. अर्थात, त्याप्रमाणे किंमतही बदलणार आहे. किंमत २४,५०० रुपयांपासून सुरू होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.