अफगाणिस्तानला मोठा फटका बसला आहे. (Afghanistan Earthquake) पश्चिम अफगाणिस्तानमध्ये सहा भूकंप झाल्याने अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सर्वात मोठा भूकंप 6.3 तीव्रतेचा होता. पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपात ३२० हून अधिक लोक ठार झाले असून शेकडो जखमी झाल्याची भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे, असे वृत्त पझवॉक अफगाण न्यूजने दिले आहे. (Afghanistan Earthquake)
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्रायलमधील भारतीय विद्यार्थी दूतावासाच्या संपर्कात; सांगितले भीतीदायक अनुभव )
हेरातमधील स्थानिक अधिकार्यांनी सांगितले की, या प्रांतातील अनेक भूकंपांमध्ये 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिंदा जान आणि घोरियान जिल्ह्यातील 12 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते जनान सैक यांनी सांगितले की, आजच्या भूकंपात हेरातच्या “जिंदा जान” जिल्ह्यातील ३ गावांतील किमान 15 लोक मरण पावले आणि जवळपास 40 जण जखमी झाले. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, फराह आणि बादघिस प्रांतातील काही घरेही अंशत: उद्ध्वस्त झाली आहेत. (Afghanistan Earthquake)
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, पश्चिम अफगाणिस्तानमध्ये 6 भूकंप झाले आणि सर्वात मोठा भूकंप 6.3 तीव्रतेचा होता. 5.9 तीव्रतेचा नवीनतम भूकंप हेरातच्या जिंदा जान जिल्ह्यात 7.7 किमी खोलीवर झाला. फराह आणि बादघिस या जवळच्या प्रांतांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
विशेषत: हिंदुकुश पर्वत रांगेत जी युरेशियन आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे अफगाणिस्तानमधील हे भूकंप झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जून 2022 मध्ये पूर्व अफगाणिस्तानच्या पर्वतीय प्रदेशात झालेल्या शक्तिशाली भूकंपात 1,000 हून अधिक लोक मारले गेले होते, तर सुमारे 1,500 जखमी झाले, असे पझवॉक अफगाण न्यूजने वृत्त दिले. (Afghanistan Earthquake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community