Israel-Palestine Conflict : इस्रायलमध्ये 22 ठिकाणी लढाई सुरू; गाझा पट्टी रिकामी करण्याचे नागरिकांना आवाहन

212
Israel-Palestine Conflict : इस्रायलमध्ये 22 ठिकाणी लढाई सुरू; गाझा पट्टी रिकामी करण्याचे नागरिकांना आवाहन
Israel-Palestine Conflict : इस्रायलमध्ये 22 ठिकाणी लढाई सुरू; गाझा पट्टी रिकामी करण्याचे नागरिकांना आवाहन

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. (Israel-Palestine Conflict) इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिचर्ड हेच यांनी सांगितले की, देशात अजूनही 22 ठिकाणी लढाई सुरू आहे. आतापर्यंत 230 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर 1700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Flipkart Big Billion Days Sale : ४५,००० हजारांचा आयफोन १४ कसा मिळेल १५,९९९ रुपयांत )

इस्रायल गाझाला वीज, इंधन आणि वस्तूंचा पुरवठा थांबवेल – पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रदेश रिकामा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तिथे आतंकवाद्यांचा प्रतिकार करणे सोयोचे होईल.  इस्रायल गाझाला वीज, इंधन आणि वस्तूंचा पुरवठा थांबवेल, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. जवळजवळ सर्व प्रदेशांची वीज पुरवठा करणार्‍या इस्रायलकडून आदल्या दिवशी होणारा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर रात्रीचा बराचसा गाझा आधीच अंधारात फेकला गेला होता. (Israel-Palestine Conflict)

1000 हून अधिक पॅलेस्टिनी इस्रायलमध्ये घुसले

इस्रायली लष्करानेही गाझा पट्टीतील 7 भागातील लोकांना आपली घरे सोडून शहरात बांधलेल्या निवारागृहांमध्ये जाण्यास सांगितले आहे. लष्कर येथे हमासच्या ठाण्यांवर हल्ले करणार आहे. अल जझीराच्या म्हणण्यानुसार, 1000 हून अधिक पॅलेस्टिनी इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. 1948 नंतर प्रथमच असे घडले आहे.

इस्रायली सैन्य गाझामध्ये प्रतिहल्ले करत आहे. आतापर्यंत हवाई हल्ले होत आहेत. जमिनीवरील हल्लेही चालू केले आहेत.  हमासने 7 ऑक्टोबर रोजी दावा केला होता की त्यांनी अनेक इस्रायलींना ओलीस ठेवले होते. वेस्ट बँक परिसरात इस्रायली लष्करी कारवाया वारंवार केल्या जात होत्या. त्यानंतर गाझाने इस्रायलला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. इस्रायल आणि हमास यांच्यात मे महिन्यात छोटीशी लढाई झाली. एका आठवड्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे तीन नेते मारले गेले. तो संघर्ष इजिप्त आणि संयुक्त राष्ट्रांनी थांबवला होता. (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.