हमास या आतंकवादी संघटनेने शक्तीशाली हल्ला करून २४ तासांहून अधिक काळ लोटला, तरी परिस्थिती इस्रायलच्या नियंत्रणात आलेली नाही. (Israel-Palestine Conflict) ज्या देशाचे तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचे उदाहरण जगभर दिले जाते, अशा इस्रायलसाठी ही चिंतेची बाब आहे. मोसाद ही इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणा आहे. त्यामुळेच इस्रायलवर हमासने केलेला हल्ला, हे मोठे आश्चर्य आहे. इस्रायलने गाझा सीमेवर अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सीमेवर कुंपण घालण्यात आले, अत्याधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले, तरीही हमासच्या आतंकवाद्यांना घुसखोरी करण्यात यश आले. ‘या हल्ल्यासाठी आपण दीर्घकाळ तयारी केली होती’, असा दावा हमास करत आहे. जगातील सर्वांत बलवान गुप्तचर संस्था मोसादलाही याबाबत सुगावा का लागला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Israel-Palestine Conflict)
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्रायलसोबतच्या हवाई वाहतुकीसंदर्भात भारताचा मोठा निर्णय )
दहशतवादी इस्रायलमध्ये कसे घुसले ?
हमासने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्या व्हिडिओमध्ये हमासचे आतंकवादी इस्रायलच्या इरेझ क्रॉसिंगवर नियंत्रण मिळवताना दिसत होते. हमासच्या सैनिकांनी आधी बॉम्बफेक करून अडथळे तोडले आणि नंतर गोळीबार करून इस्रायलमध्ये भागात प्रवेश केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहता हमासने या घुसखोरीची योजना कसून आखल्याचे दिसते. (Israel-Palestine Conflict)
आतंकवादी संघटनेची स्वतःची क्षेपणास्त्र यंत्रणा
हमासने आणखी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्याचे आतंकवादी प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर हमासने स्वतःची क्षेपणास्त्र प्रणालीही बनवली होती. ती प्रणाली आतंकवाद्यांनी इस्रायलविरुद्ध वापरली आहे. इस्रायलमध्ये घुसखोरी केल्यानंतर रानजुम नावाच्या या शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टिमची छायाचित्रे हमासने जारी केली होती. व्हिडिओमध्ये हमासचे सैनिक या क्षेपणास्त्र प्रणालीने इस्रायलवर हल्ला करताना दिसत आहेत.
हमासची तयारी पक्की
हमासच्या आतंकवाजद्यांनी जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून एकाच वेळी घुसखोरी केली. भरपूर तयारीशिवाय हे शक्य नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. तरीही इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांना याचा सुगावाही लागला नाही, हे धक्कादायक आहे.
मोसाद अयशस्वी का झाली ?
इस्रायलच्या सुरक्षेत ही मोठी त्रुटी रहाण्यामागे अतिआत्मविश्वास आणि निष्काळजीपणा ही प्रमुख कारणे असू शकतात, असे तज्ञ सांगत आहेत. हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर सुमारे ५ हजार क्षेपणास्त्रे डागली आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यातून इस्त्रायली सुरक्षा दलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. कदाचित त्यामुळेच हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी तर केलीच; पण काही लोकांना ओलीसही घेतले. इस्रायलमधील छायाचित्रांवरून असे दिसून येते की, या काळात त्यांना कोठेही इस्रायली सुरक्षा दलांकडून प्रतिकाराचा सामना करावा लागला नाही. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community