इस्रायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी (Israel Palestine conflict) संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्रायलमध्ये अडकली होती. नुसरत भरुचाच्या टीम सदस्याने शनिवारी (७ ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली. एका निवेदनात तिच्या टीममधील सदस्याने सांगितले की, “दुर्दैवाने नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती.”
पुढे सांगताना नुसरतच्या टीमने सांगितले की; “आमचा तिच्याशी शेवटचा संपर्क शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास झाला, जेव्हा ती (Israel Palestine conflict) सुरक्षित होती. उर्वरित माहिती सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शेअर केली जाऊ शकत नाही. मात्र, तेव्हापासून आमचा त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही नुसरतशी पुन्हा संपर्क साधून तिला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांना सुरक्षितपणे आणि कोणतीही हानी न करता भारतात परत आणू अशी आशा आहे.”
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्रायलमध्ये 22 ठिकाणी लढाई सुरू; गाझा पट्टी रिकामी करण्याचे नागरिकांना आवाहन)
त्यानंतर आता हाती आलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच रविवार ८ ऑक्टोबर रोजी नुसरतचा इस्रायल (Israel Palestine conflict) ते भारत हा परतीचा प्रवास सुरु झाला असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
रिल झाले रिअल
नुसरतचा काही दिवसांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट २०२३ मध्ये ‘अकेली’ (Akeli) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामधून इराकमधील युद्धात अडकलेल्या एका मुलीचा घरी परतण्यासाठीचा संघर्ष (Israel Palestine conflict) दाखवण्यात आला होता. या सिनेमात नुसरतच्या दर्जेदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. पण सिनेमातल्या कथेप्रमाणे आता नुसरत इस्त्राइलमध्ये झालेल्या युद्धात अडकली आहे. त्यामुळे नुसरतचे रिल आयुष्य रिअल झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community