हमासने केलेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आता इस्रायलने हमासवर प्रतिहल्ले चालू केले आहेत. इस्रायली सैन्याने एका रात्रीत हमासची शेकडो ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. संपूर्ण जग झोपले असताना इस्रायली सैन्याच्या प्रतिहल्ल्यांमुळे गाझा प्रदेश रात्रभर धुमसत होता. रात्रभर इस्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरू होते. इस्रायलने हमासच्या अनेक जागा रातोरात नष्ट केल्या. त्याचवेळी हमासनेही रात्रभर बॉम्बफेक सुरू ठेवली. रॉकेट हल्ले टाळण्यासाठी इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा ‘आयर्न डोम’ही सक्रिय होती. गाझा पट्टीतून 150 रॉकेट डागण्यात आले आणि इस्रायलने ते रॉकेट हवेत नष्ट केले. इस्रायलमध्ये अशी संघर्षाची स्थिती असतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्याविषयी भाष्य केले आहे. याला इस्रायली लष्करानेही प्रत्युत्तर दिले.
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : मोसादसारखी जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणा असूनही इस्रायल हमासला का रोखू शकले नाही ?)
इस्रायलला बचाव करण्याचा अधिकार आहे – बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, ‘जग भयानक चित्रे पाहत आहे. इस्रायलच्या शहरांवर हजारो रॉकेटचा वर्षाव होत आहे. हमासचे दहशतवादी केवळ इस्रायली सैनिकांनाच मारत नाहीत, तर रस्त्यावर आणि घरांमध्ये नागरिकांचीही हत्या करत आहेत. ते अविवेकी आहे. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे.’
The world is seeing appalling images.
Thousands of rockets raining down on Israeli cities. Hamas terrorists killing not only Israeli soldiers, but civilians on the streets and in their homes.
It’s unconscionable. Israel has a right to defend itself – full stop.
— President Biden (@POTUS) October 7, 2023
इस्रायली सैन्याचे बायडेन यांना उत्तर
बायडेन यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना इस्रायल संरक्षण दलाने लिहिले की, आम्हाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही करू !
We have the right to defend ourselves, and we will 🇮🇱 https://t.co/IR7A6s6G4o
— Israel Defense Forces (@IDF) October 8, 2023
दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले
इस्त्रायली सैन्याने रात्रभर युद्धाची व्याप्ती वाढवत ठेवली आहे. याचा पुरावा म्हणजे त्याचे 10 रणगाडे इस्रायलच्या दक्षिण सीमेकडे जाताना दिसले. इस्रायलने गाझाजवळील एका शहरात बुलडोझरने स्वतःचे एक पोलीस ठाणे उद्ध्वस्त केले. अनेक पॅलेस्टिनी घुसखोरांनी पोलीस ठाण्यात आश्रय घेतला होता. त्यांना हटवण्यासाठी इस्रायलने बुलडोझरचा वापर केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community