महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) म्हणजेच मनसेचं आंदोलन हे नेहमीच आक्रमक असत. मग ते दुकानांवरील मराठी पाट्या संदर्भात असो किंवा मग टोलवधीच्या विरोधात. मात्र सध्या मनसेने आपला अजेंडा बदलला की काय असा सर्वांना प्रश्न पडला होता. मात्र आता या चर्चाना स्वतः राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.
मनसेचे (Raj Thackeray) ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मागील ४ दिवसांपासून टोलवाढीविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. राज ठाकरे यांनी आज अविनाश जाधव यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘उपोषण ही मनसेची पद्धत नाही’ (Raj Thackeray) असे सांगितलं.
(हेही वाचा – Bus Accidents : भोरच्या वरंधा घाटात मोठी दुर्घटना! ६० फूट खोल दरीत कोसळली मिनी बस)
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “उपोषण ही पद्धत मनसेची नाही. मी अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यालाला लावले आहे. आम्ही ६५ टोल बंद केले. मात्र सरकार काहीच करत नाहीये.
मी येत्या २-३ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा करणार असून मी नंतर या विषयी अजून बोलीन. असे राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी म्हणाले. शिवसेना आणि भाजपने जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची भूमिका मांडली होती. पत्रकार त्यांना प्रश्न विचारात नाहीत. एकनाथ शिंदे पण ठाण्याचे आहेत. निवडणूक जवळ येते आहे. अशावेळी टोलचा त्रास त्यांनाही होऊ शकतो असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community