लेबेनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात एक निवेदन जारी केले होते. (Israel-Palestine Conflict) यामध्ये लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने गाझामधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हा इस्रायलविरुद्ध निर्णायक प्रतिसाद होता.’ इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने मिठाई वाटून आनंद साजरा केला होता. हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी हमासच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत हिजबुल्लाहच्या झेंड्यासह पॅलेस्टिनी झेंडे फडकावले. तेथे उपस्थित असलेले दहशतवादी रस्त्यावरून जाणाऱ्यांना मिठाईचे वाटप करत होते. लेबेनॉनच्या या कृतीला इस्राईलने त्वरित प्रत्युत्तर दिले आहे. (Israel-Palestine Conflict)
(हेही वाचा – Amit Shah : उत्तम कायदा आणि सुव्यवस्था ही विकासाची पहिली अट)
इस्रायलने लेबेनॉनवर प्रचंड बॉम्बफेक करून हिजबुल्लाहचे ठिकाण उद्ध्वस्त केले. हमास या दहशतवादी संघटनेचा हल्ला झाल्यानंतर इस्रायलने हिजबुल्ला या अन्य दहशतवादी संघटनेकडून असलेला धोका लक्षात घेऊन लेबनॉनच्या उत्तर सीमेवर इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) सक्रिय करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयातून प्रसारित केलेल्या निवेदनानुसार, ‘संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी आयडीएफच्या गरजेनुसार राखीव दलाच्या मसुद्याला मंजुरी देताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई केली जाईल’, असे सांगितले होते.
या देशांचा आतंकवादाला पाठिंबा
इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर जगभरातील दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांनी जल्लोष सुरू केला. हमासच्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणने तोंडी पाठिंबा दिला होता. इराण, इराक आणि जॉर्डनने तालिबानला इस्त्रायलला जाण्यासाठी मार्ग द्यावा, असेही तालिबानने म्हटले आहे. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community