इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला झाला आहे. (Israel-Palestine Conflict) प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी करणाऱ्या हल्ल्यामागे काय कारण आहे, याविषयी तज्ञ आपापली मते मांडत आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीने सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये दीर्घकालीन करार होणार आहे. या इस्रायल-सौदी करारात खोडा घालण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता काही तज्ञांनी बोलून दाखविली आहे.
(हेही वाचा – Israel-Palestine War : युद्ध बराच काळ चालणार असल्याने नागरिकांनी तयार रहावे, पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा)
तज्ञ सांगतात, ”हा करार होऊ नये, यासाठी इराणचे पाठबळ असलेल्या हमासने हा हल्ला चढविला असू शकतो. इस्रालयमध्ये हल्ला करणाऱ्या हमासच्या सैनिकांनी फेकलेल्या पत्रकांमध्ये ‘पॅलेस्टाईनला बाजुला ठेवून शांततेचा कोणताही करार होऊ शकत नाही,’ असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही शक्यता बळावली आहे. दुसरीकडे हमासच्या प्रवक्त्यांनी सर्व अरब विश्वाला इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आव्हान केले आहे. (Israel-Palestine Conflict)
या परिस्थितीत इस्रायलशी शांतता करार केलेली किंवा करार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली अरब राष्ट्रे काय भूमिका घेणार हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांच्या सीमा इस्रायलला भिडल्या आहेत. या देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली, तर आखातामध्ये दीर्घकालीन आणि रक्तरंजित युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाची भूमिकाही महत्त्वाची असेल. किंबहुना एका अरब राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या इस्रायलशी सौदी सुलतान करार करणार नाहीत, असे गणित या हल्ल्यामागे असू शकेल.” (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community