भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) (ISRO Cyber Attack) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शनिवारी (७ ऑक्टोबर) सांगितले की, इस्रोला दररोज 100 हून अधिक सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. केरळच्या कोची येथे आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेदरम्यान समारोप सत्रात बोलताना एस सोमनाथ पुढे म्हणाले की, “अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि चिप-आधारित हार्डवेअरचा वापर करणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर हल्ल्यांची शक्यता खूप जास्त वाढली आहे. अशा हल्ल्यांचा सामना करण्यासाठी इस्रो (ISRO Cyber Attack) सज्ज आहे. इस्रोची प्रणाली सायबर सुरक्षा नेटवर्कने सुसज्ज आहे. त्यात कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही.”
इस्रो (ISRO Cyber Attack) प्रमुख पुढे म्हणाले की, सॉफ्टवेअर व्यतिरिक्त, रॉकेटच्या आतील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून इस्रो विविध चाचण्या घेऊन पुढे जात आहे. “पूर्वी, एकावेळी एका उपग्रहाचे निरीक्षण करता येत होते, मात्र आता हीच पद्धत बदलून एका वेळी अनेक उपग्रहांवर देखरेख ठेवण्याच सॉफ्टवेअर आले आहे. हे या क्षेत्राची वाढ दर्शवते. कोविडच्या काळात, दुर्गम ठिकाणाहून प्रक्षेपण करणे शक्य होते, जे तंत्रज्ञानाचा विजय दर्शवते.”
(हेही वाचा – Indian Air Force : चिनुक अन् सी-२९५ने वाढवली हवाई दलाची ताकद)
नेव्हिगेशन, देखभाल इत्यादींसाठी विविध प्रकारचे उपग्रह आहेत, आणि या व्यतिरिक्त, सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाला मदत करणारे उपग्रह देखील उपस्थित आहेत. हे सर्व विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. या सर्वांच्या संरक्षणासाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असे एस (ISRO Cyber Attack) सोमनाथ म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community