मोठमोठ्या स्फोटांचा आवाज, भांडीमध्ये विरघळलेल्या दारुगोळ्याचा वास, धोक्याचे संकेत देणाऱ्या सायरनचा आवाज, चारही बाजूंच्या किंचाळ्या, पत्त्यां प्रमाणे कोसळणारी इमारत. गाझामध्ये भयानक परिस्थिती, अनेक भागात वीजपुरवठा खंडित, हमास मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की गाझामध्ये ४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. डझनभर दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या अनेक महिला बेपत्ता झाल्या आहेत. संबंधित महिलांचं हमास दहशतवादी संघटनेनं अपहरण केल्याची माहिती मिळत आहे. (Hamas-Israel war)
पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेनं शनिवारी सकाळी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. हमासकडून एकाच वेळी पाच हजार रॉकेट सोडल्याने इस्रायलमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.यामुळे हमास दहशतवादी संघटनेकडून बलात्काराचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याची भीती ‘इस्रायल वॉर रुम’कडून व्यक्त करण्यात आली आहे.
Hamas seems to have kidnapped mostly women.
It has already been confirmed that Hamas fighters are using rape as a weapon of war.
There must be no mercy for these barbarians. https://t.co/ICTubV3k0B
— Israel War Room (@IsraelWarRoom) October 7, 2023
‘इस्रायल वॉर रुम’ या स्वयंसेवी संस्थेनं आपल्या अधिकृत अकाऊंटवर हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलांचा फोटो शेअर केला. यावेळी हमासकडून शस्त्र म्हणून बलात्काराचा वापर केला जात असल्याची भीती व्यक्त केली.‘इस्रायल वॉर रुम’ ने अधिकृत ‘एक्स’ खात्यावर लिहिलं की, हमास या दहशतवादी संघटनेनं बहुतेक महिलांचं अपहरण केल्याचं दिसत आहे. हमासचे दहशतवादी बलात्काराचा वापर युद्धाचं शस्त्र म्हणून करत असल्याची पुष्टी यापूर्वीच झाली आहे. या अशा क्रूरतेचा कळस गाठणाऱ्यांवर दया दाखवू नये. (Hamas-Israel war)
(हेही वाचा : Students Ragging : धक्कादायक! पालघरमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांचे रॅगिंग, कानशिल आणि गुप्तांगावर मारहाण)