पालघरातील जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya in Palghar) दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी या मुलांचे रॅगिंग (Students Ragging) करून त्यांना मारहाण केली. यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील जवाहर नवोदय या केंद्रीय विद्यालयाच्या उदयगिरी वसतीगृहात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अकरावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले त्यानंतर जे विद्यार्थी उशिरा आले. त्यांना उभे राहायला सांगून प्रत्येकाच्या कानशिलात सात ते आठ वेळा लगावली. या विद्यार्थ्यांना मारहाण केली. एका विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारण्यात आले. झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही वाच्यता करून नका असा दमही दिला. कानशिलात मारल्यामुळे एका विद्यार्थ्यांचा कान दुखू लागला. कानाला झालेली दुखापत बघून नर्सने सांगितले की, मुलांच्या आई-वडिलांना बोलावून घ्या आणि डॉक्टरांकडे तपासणी करा, असे सांगितले.
(हेही वाचा – Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल PMO ने केला खुलासा .. काय आहे त्यांची भूमिका)
या शाळेतला दहावीचा विद्यार्थी निखिल सिंग याच्या कानावर सात-आठ वेळा मारल्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. विशाल कुशवा आणि सुशांत सोनकर या विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात आले. यात विशालचा कान सुजला होता, तर सुशांत सोनकर या विद्यार्थ्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली.