Israel Palestine Conflict : मृत्यूचे तांडव सुरूच ३१३ पॅलेस्टिनींचा व ६०० इस्रायली लोक मृत्युमुखी

147
Israel Palestine Conflict : मृत्यूचे तांडव सुरूच ३१३ पॅलेस्टिनींचा व ६०० इस्रायली लोक मृत्युमुखी
Israel Palestine Conflict : मृत्यूचे तांडव सुरूच ३१३ पॅलेस्टिनींचा व ६०० इस्रायली लोक मृत्युमुखी

फक्त देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला धडकी भरवणारी जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा असलेली ‘मोसाद’ सारखी गुप्तचर संस्था, अत्याधुनिक शस्त्रत्रांनी सज्ज असलेली लष्करी बळ आणि सोबतीला तितकीच हायटेक यंत्रणा असताना इस्राईलमध्ये हमासने घुसखोरी करून केलेल्या हल्ल्याने अवघ्या जगाला भयभीत केले आहे.आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ३१३ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, किमान ६०० इस्रायली मृत्यूमुखी पडले आहेत. (Israel Palestine Conflict)

इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर हमास आणि इस्रायली सैन्य यांच्यात दक्षिण इस्रायलमधील अनेक भागात जोरदार लढाई सुरू आहे.हिजबुल्लाहने लेबनॉनमधून वादग्रस्त शेबा फार्मवर मोर्टार हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांनी तोफखान्याने प्रत्युत्तर दिले आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वेढा घातलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हला ओसाड बेट मध्ये बदलण्याची धमकी दिल्यानंतर गाझावरील जमिनीवर आक्रमणाची भीती वाढत असताना हिजबुल्लाहकडून हल्ला. इस्रायली हल्ले, पूर्व जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद कंपाऊंडमध्ये वाढलेला तणाव, विक्रमी संख्येने पॅलेस्टिनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर हमासची हस्त्रायलवर हल्ला.

(हेही वाचा : Indian Air Force Day : ९२व्या हवाई दल दिनानिमित्त सैनिक आणि कुटुबियांना शुभेच्छा !)

हमासने सुरुवातीच्या बॅरेजमध्ये ५०००  रॉकेट सोडले. इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार २५०० रॉकेट डागण्यात आले. इस्रायली निवासी भागात धुराचे लोट पसरले आणि सायरन वाजल्याने लोकांनी इमारतींच्या मागे आश्रय घेतला. दुसरीकडे, गाझा आणि इस्रायलला वेगळे करणार्‍या सुरक्षा कुंपणातून हमास फायटरांनी प्रवेश केला. एक हमास फायटर पॉवर पॅराशूटमधून उडताना व्हिडिओमध्ये शूट झाला. सैनिकांना घेऊन जाणारी एक मोटारबोट झिकिम या इस्रायली किनारपट्टीवर लष्करी तळ असलेल्या शहराकडे जाताना दिसली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.