Israeli-Palestinian Conflict: इस्त्रायलमध्ये दुहेरी युद्ध लढत, हमासनंतर तोफा हिजबुल्लाच्या स्थानाकडे वळल्या

137
Israeli-Palestinian Conflict: इस्त्रायलमध्ये दुहेरी युद्ध लढत, हमासनंतर हिजबुल्लाच्या स्थानांवर गोळीबार
Israeli-Palestinian Conflict: इस्त्रायलमध्ये दुहेरी युद्ध लढत, हमासनंतर हिजबुल्लाच्या स्थानांवर गोळीबार

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनच्या (Israeli-Palestinian Conflict) सध्या सुरू असलेल्या संघर्षात लेबनॉनच्या हिजबुल्लाह देशानेही हल्ला करायला सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी हिजबुल्लाहने दक्षिणी लेबनॉन भागातून इस्त्रायलवर गोळीबार केला. या माऱ्याला प्रत्युत्तर देताना इस्त्रायलनेही आपल्या तोफा हिजबुल्लाच्या स्थानाकडे वळल्या आहेत.

यामुळे इस्त्रायल आणि लेबनॉनच्या शक्तिशाली सशस्त्र गट हिजबुल्ला यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांवर तोफखाना आणि क्षेपणास्त्रे डागत आहेत. इस्त्रायली लष्कराने लेबनीज सीमेवर असलेल्या हिजबुल्लाहच्या चौकीवर हल्ला केल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Israel Palestine Conflict : मृत्यूचे तांडव सुरूच ३१३ पॅलेस्टिनींचा व ६०० इस्रायली लोक मृत्युमुखी )

इस्त्रायली सेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने पॅलेस्टिनी समुहाच्या नेत्यांशी संपर्क साधला. इस्त्रायलवरील पॅलेस्टिनी हल्ल्याचे त्यांनी समर्थन केले आहे. “आमच्या बंदुका आणि रॉकेट तुमच्यासोबत आहेत,” वरिष्ठ हिजबुल्लाह अधिकारी हाशेम सफीद्दीन यांनी बेरूतच्या बाहेरील पॅलेस्टिनी सैनिकांना सांगितले. आमच्याकडे जे काही आहे ते तुमचे आहे. हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या दहिहमध्ये याकरिता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.