इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे जगात आर्थिक अस्थिरतेची स्थिती परिस्थिती निर्माण झाली आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. सर्वच देशातील शेअर बाजार (Share Market) कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडतात. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
सोने ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचा दर ६९ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे.
(हेही वाचा – Israeli-Palestinian Conflict: इस्त्रायलमध्ये दुहेरी युद्ध लढत, हमासनंतर तोफा हिजबुल्लाच्या स्थानाकडे वळल्या)
शेअर बाजारावर विपरीत परिणाम…
जागतिक वातावरण बदलल्याने शेअर बाजारावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात १ हजार ६०० रुपयांची वाढ झाली, तर सोन्याचे भाव ३०० रुपयांनी वाढले होते. रविवारी ८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. रविवारी सोन्या-चांदीचे स्थिर असतात, मात्र जगावरील युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामामुळे सोन्याचा दर वाढला आहे.