हमासने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर इस्राइलच्या लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात बॉम्बस्फोट आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने १४ ऑक्टोबर २०२३ पर्यत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहे. (Israeli–Palestinian Conflict )
इस्राईल आणि पॅलेस्टिनियन यांच्यात सुरु झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी एअर इंडियाने १४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत इस्राईल ला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहे. एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणाऱ्या उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
(हेही वाचा : Israeli-Palestinian Conflict: इस्त्रायलमध्ये दुहेरी युद्ध लढत, हमासनंतर तोफा हिजबुल्लाच्या स्थानाकडे वळल्या)
आमचे प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आमची रद्द केली आहे. ज्या प्रवाशांनी अगोदरच विमानाचे आरक्षित तिकीट असलेल्या त्यांना प्रवाशांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न एअर इंडिया एअरलाईन्सकडून करण्यात येणार आहे. दर आठवड्याला राजधानी दिल्ली ते तेल अवीवच्या एअर इंडियाची पाच उड्डाणे होतात.
Join Our WhatsApp Community