Nanded Government Hospital : नांदेड मध्ये मृत्यूचे तांडव सुरूच २४ तासात ६ बालकांसह १५ जणांचा मृत्यू

मागील ७ दिवसापासून नवजात बालकांच्या मृत्यूचं सत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणा नक्की काय करते असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

133
Nanded Government Hospital : नांदेड मध्ये मृत्यूचे तांडव सुरूच २४ तासात ६ बालकांसह १५ जणांचा मृत्यू
Nanded Government Hospital : नांदेड मध्ये मृत्यूचे तांडव सुरूच २४ तासात ६ बालकांसह १५ जणांचा मृत्यू

नांदेड येथील विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय विद्यालय-रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच आहे. काहीच दिवसांपूर्वी एकूण ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात तब्बल ३७ नवजात बालकांचा समावेश आहे. मागील २४ तासात रुग्णालयात ६ नवजात बालकांसह १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील ७ दिवसापासून नवजात बालकांच्या मृत्यूचं सत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणा नक्की काय करते असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. (Nanded Government Hospital )

१ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ जणांचा झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता. एकाच दिवशी २४ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर शासकीय मनुष्यबळाची कमतरता आणि औषधाच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आला. आरोग्य यंत्रणेवरही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अशातच सलग सातव्या दिवशी पण मृत्यूचं प्रमाण सुरूच आहे. मागील ७ दिवसात अत्यवस्थ असलेल्या ३७ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ऑक्टोबर रोजी १२ नवजात बालकं, २ ऑक्टोबर रोजी ४ नवजात बालकं, ३ ऑक्टोबर रोजी २ नवजात बालकं, ४ ऑक्टोबर रोजी ५ अर्भक, ५ ऑक्टोबर रोजी ४ अर्भक, ६ ऑक्टोबर रोजी १ नवजात बालक तसेच आज ७ ऑक्टोबर रोजी ६ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. (Nanded Government Hospital )

(हेही वाचा : Share Market : इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे जगात आर्थिक अस्थिरता, शेअर बाजारावर विपरित परिणाम)

दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूच्या थैमानाने राज्यात खबबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट आढावा घेतला. त्यातच सोमवारी( ९ ऑक्टोबर) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रुग्णालयाला भेट देणार आहेत. आढावा घेतल्यानंतर रुग्णालयातील रिक्त पदाबाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.