Afghanistan Earthquake : मृतांचा आलेख चढताच

115
Afghanistan Earthquake : मृतांचा आलेख चढताच

अफगाणिस्तानमध्ये खूप मोठा भूकंप झाला आहे. (Afghanistan Earthquake) पश्चिम अफगाणिस्तानमध्ये सहा भूकंप झाल्याने अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. हा भूकंप सर्वात मोठा म्हणजेच 6.3 तीव्रतेचा होता. या भूकंपात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोक ठार झाले असून शेकडो जखमी झाल्याची भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.

हेरातमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिंदा जान आणि घोरियान जिल्ह्यातील 12 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त (Afghanistan Earthquake) झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते जनान सैक यांनी सांगितले की, आजच्या भूकंपात हेरातच्या “जिंदा जान” जिल्ह्यातील ३ गावांतील किमान 15 लोक मरण पावले आणि जवळपास 40 जण जखमी झाले. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, फराह आणि बादघिस प्रांतातील काही घरेही अंशत: उद्ध्वस्त झाली आहेत.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: इस्त्रायलचा हल्ला ९/११ सारखा)

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, पश्चिम अफगाणिस्तानमध्ये 6 भूकंप (Afghanistan Earthquake) झाले आणि सर्वात मोठा भूकंप 6.3 तीव्रतेचा होता. 5.9 तीव्रतेचा नवीनतम भूकंप हेरातच्या जिंदा जान जिल्ह्यात 7.7 किमी खोलीवर इ. फराह आणि बादघिस या जवळच्या प्रांतांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

विशेषत: हिंदुकुश पर्वत रांगेत जी युरेशियन आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे अफगाणिस्तानमधील हे भूकंप (Afghanistan Earthquake) झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जून 2022 मध्ये पूर्व अफगाणिस्तानच्या पर्वतीय प्रदेशात झालेल्या शक्तिशाली भूकंपात 1,000 हून अधिक लोक मारले गेले होते, तर सुमारे 1,500 जखमी झाले, असे पझवॉक अफगाण न्यूजने वृत्त दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.