मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections)घोषणा केली. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होईल. या व्यतिरिक्त सर्व चारही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल आणि याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाचे (Assembly Elections) मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मिझोरममधील 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. नक्षलग्रस्त छत्तीसगड राज्यांत 119 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाईल. मध्यप्रदेशातील 230 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राजस्थानमधील 200 जागांसाठी 23 नोव्हेंबर रोजी तर तेलंगणातील 90 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणे आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि याच दिवशी निकाल घोषित केला जाणार आहे.
(हेही वाचा-Cyber Security Project : सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी ८३७ कोटींची मंजुरी, असा असणार सायबर सुरक्षा प्रकल्प )
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, पाचही राज्यांतील 679 विधानसभेच्या जागांसाठी 16 कोटी 14 लाख मतदार आपल्या मताधिकाराचा उपयोग करतील. यात 8.2 कोटी पुरूष, 7.8 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. यावेळी 60 लाख तरूण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यांचे वय 18 ते 19 दरम्यान आहे. 15.39 लाख मतदान असे आहेत जे वयाची 18 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांनी मतदार म्हणून अडव्हांस अर्ज केला आहे.
राज्यनिहाय मतदारांची आकडेवारी सांगायची झाली तर मध्यप्रदेशात 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी, तेलंगानात 3.17 कोटी, छत्तीसगडमध्ये 2.03 कोटी आणि मिजोरम- 8.52 लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबर रोजी संपत आहे. उर्वरित चारही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये संपत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community