Balasore Train Accident : ‘त्या’ मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार

144
Balasore Train Accident : 'त्या' मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार

ओडिशाच्या बालासोर येथे 2 जून 2023 रोजी भीषण (Balasore Train Accident) रेल्वे अपघात झाला होता. या अपघातातील बेवारस मृतदेहांवर मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती भुवनेश्वर महापालिकेने दिली आहे.

बालासोर रेल्वे अपघातात (Balasore Train Accident) २९७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी २६९ प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांनी नेले. उर्वरित २८ मृतदेह घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी भुवनेश्वर महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी रविवारपासून २८ अनोळखी मृतदेहांचे विघटन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या मृतदेहांचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी महापालिकेने एसओपी जारी केला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह महापालिकेच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Raj Thackeray : पुन्हा एकदा ‘लाव रे व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये)

रेल्वे अपघाताची चौकशी करणाऱ्या सीबीआयने खुर्दाच्या (Balasore Train Accident) जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मृतदेह कुजवण्यास सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले. जूनमध्ये झालेल्या अपघातानंतर मृतदेह एम्स भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात आले होते. बीएमसीने (Balasore Train Accident) जारी केलेल्या एसओपीनुसार, संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.