ICC World Cup 2023 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खरंच वेगळी जर्सी परिधान करणार का? 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ वेगळी जर्सी घालून उतरेल अशी एक बातमी अलीकडेच मीडियात पसरली होती. बीसीसीआयने आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे 

238
ICC World Cup 2023 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खरंच वेगळी जर्सी परिधान करणार का? 
ICC World Cup 2023 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खरंच वेगळी जर्सी परिधान करणार का? 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघाची विश्वचषक मोहीम (ICC World Cup 2023) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने सुरू झाली आहे. पण, या स्पर्धेत सगळ्यांचं लक्ष आहे ते पारंपरिक प्रतिस्पर्धा भारती आणि पाकिस्तान दरम्यानच्या लढतीकडे! १४ ऑक्टोबरला होणारी ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

या सामन्यात भारतीय संघ वेगळी जर्सी घालून खेळणार असल्याची एक बातमी अलीकडेच मीडियामध्ये पसरली होती. या बातमीची इतकी चर्चा झाली की, अखेर बीसीसीआयला आता समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. आणि पाकिस्तान विरुद्घचा सामना इतर सामन्यांपेक्षा वेगळा नाही, असंच बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार यांनी अधिकृत पत्रकात म्हटलंय की, ‘मीडियात प्रसिद्ध झालेली ही बातमी अगदीच बिनबुडाची आहे. आणि काही लोकांच्या कल्पक डोक्यातून निघालेली कल्पना आहे. भारतीय संघ या विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये एकाच प्रकारची जर्सी घालून खेळणार आहे. भारतीय जर्सीचा रंग एकच असेल, निळा.’

शेलार यांच्या या विधानानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या स्पर्धेत सरावादरम्यान भारतीय संघ केशरी रंगाचं किट घालत आहे. त्यानंतर भारतीय जर्सीबद्दल चर्चांना उत आला होता.

(हेही वाचा-Indian Air Force Day : हवाई दलाचा नवीन ध्वज झळकला)

यापूर्वी भारताने कधी बदलला जर्सीचा रंग? 

यापूर्वी भारताने जर्सीचा रंग कधीच बदललेला नाही असंही नाही. २०१९ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात वेगळ्या रंगाच्या जर्सीत उतरली होती.

पण, तेव्हाचं कारणही वेगळं होतं. दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या होत्या. त्यामुळे मैदानात संघ वेगळे ओळखता यावेत म्हणून भारतीय संघ गर्द निळ्या रंगाचा टीशर्ट आणि त्याला कॉलर तसंच हाताला केशरी रंगाची कडा असलेली जर्सी घालून मैदानात उतरली होती.

हा एकमेव अपवाद सोडला तर भारतीय संघाने कधीही एकाच स्पर्धेत दोन जर्सी वापरलेल्या नाहीत. फुटबॉल स्पर्धांमध्ये संघांची संख्या जास्त असल्यामुळे रंगांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खेळाडूंना वेगवेगळ्या रंगाची किट्स दिली जातात. पण, क्रिकेटमध्ये सध्या तरी ही पद्धत नाही.

दरम्यान, जर्सीची ही बातमी पसरवण्याचा संशय असलेला ग्रेट ब्रिटनचा नागरिक आणि युट्यूब इन्फ्लुएन्सर डॅनिएल जार्विसला आयसीसीने स्पर्धेदरम्यान सामन्यांच्या ठिकाणी यायला बंदी घातली आहे. जार्विस इंग्लंडमध्येही नियम मोडून स्टेडिअममध्ये तसंच ड्रेसिंग रुममध्ये घुसण्यासाठी प्रसिद्ध आहे. चेन्नईतही तो सरावादरम्यान सतत मैदानात होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी तर तो भारतीय खेळाडूंच्या अगदी जवळ पोहोचला होता. विराट कोहलीशी हस्तांदोलन करण्याचाही त्याने प्रयत्न केला. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला केलं. आणि त्यानंतर आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.