Ind vs Aus : भारतीय विजयानंतर माजी खेळाडूंनी केला संघावर कौतुकाचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे.

145
India Tour of Sri Lanka : टी-२० साठी सूर्यकुमार यादवच कर्णधार; रोहित, विराट एकदिवसीय मालिका खेळणार
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. भारतीय संघाच्या कामगिरीविषयी माजी खेळाडूंनी कौतुक केलं आहे. खासकरून विराट आणि राहुलवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना भारतीय संघाने ५२ चेंडू आणि ६ गडी राखून जिंकला. विजयाचे मोलाचे २ गुणही संघाने वसूल केले. या विजयात विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या १६५ धावांच्या भागिदारीने मोलाची भूमिका बजावली. (Ind vs Aus)

भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत रोखल्यानंतर हे आव्हान भारतीय फलंदाजांना तितकंसं जड जाणार नाही, असं सुरुवातीला वाटलं होतं. पण, स्टार्क आणि हेझलवूलने भारताची अवस्था पहिल्या दोन षटकांतच ३ बाद २ अशी केली होती. त्यानंतर विराट आणि राहुलची जोडी जमली. आणि त्यांनी संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढलं. (Ind vs Aus)

भारतीय संघाचा विजय पूर्ण झाल्यावर सोशल मीडिया ट्विटरवर खेळाडूंचं अभिनंदन करणारे संदेश सुरू झाले. सगळ्यात पुढे होता तो माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग, शेवटचा चेंडू पडल्या पडल्या सेहवागचा संदेश झळकला. त्याने लिहिलं होतं, ‘जब मॅटर बडे होते है, तो विराट कोहली खडे होते है!’ त्याचबरोबर सेहवागने विराट कोहलीचा चेहऱ्यावर निर्धार असलेला एक फोटोही टाकला आहे. (Ind vs Aus)

तर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाच्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

‘भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १९९ धावांमध्ये रोखण्याचं चोख काम केलं. आणि त्यानंतर राहुल आणि विराटच्या भागिदारीमुळे भारतीय विजय शक्य झाला. ऑस्ट्रेलियाला संघात डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाची उणीव भासली, असं मला वाटतं,’ सचिनने आपल्या संदेशात म्हटलंय. (Ind vs Aus)

(हेही वाचा – K L Rahul Reaction After The Six : विजयी षटकारानंतर के एल राहुल मटकन खाली का बसला?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.