सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र या हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न करण्यात आल्याने सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
अधिक माहितीनुसार, शनिवार ७ ऑक्टोबर रोजी अज्ञातांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली. मारहाणीच्या 48 तासानंतरही पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णीं (Heramb Kulkarni) यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी (Pratima Kulkarni) यांनी केला. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी घटनेची माहिती दिली आहे.
त्यांच्या या हल्ल्याची आणि तक्रारीची दखल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. लेखक हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःहून तब्येतीबद्दल विचारपूस केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
(हेही वाचा – Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा आलेख चढता)
गेल्या काही दिवसांपासून ते शिकवत असलेल्या शाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता (Heramb Kulkarni) हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) हे येथील सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते व त्यांचे सहशिक्षक सुनील कुलकर्णी हे शनिवारी दुपारी दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. रॉडने हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली. सुनील कुलकर्णी यांनी हल्लेखोरांपासून हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. जमाव जमल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community