सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात औषधे मिळावीत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जेनेरिक औषध दुकान योजना (generic medicine store Scheme ) राबवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ ऑगस्टपासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील पहिले दुकान सुरू करण्याचा मान पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील बालभीम विकास सेवा संस्थेला मिळाल असून या दुकानाचे ऑनलाईन उद्घाटन १५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
या योजनेंतर्गत सुरू होणाऱ्या पहिल्या दुकानाबाबत पन्हाळा सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांनी दिलेली माहिती अशी की, या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला प्रत्येक गावात परवडणाऱ्या दरात औषधे मिळतील. विविध विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे.
(हेही वाचा – Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा आलेख चढता )
या योजनेनिमित्त फार्मासिटिकल ब्युरो ऑफ इंडियाचे सहाय्यक व्यवस्थापक अनुज तिवारी, कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, पन्हाळा, सहाय्यक निबंधक नारायण परजणे, व्ही. एस. मठ्ठीमनी, एम. एम. पाटील, एच. डी. खोत यांनी संस्थेला भेट देऊन दुकानासाठी लागणारी जागा, कर्मचारी, फर्निचर आणि यंत्र सामग्रीची पाहणी केली तसेच औषधांच्या खर्चात बचत होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण औषधे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार आहेत.
हेही पहा –